esakal | स्नेहावर भडकल्या सुरेखाताई; दादुस देणार का साथ?
sakal

बोलून बातमी शोधा

Sneha Wagh

स्नेहामुळे दुखावले गेले दादुस आणि सुरेखा.

BBM 3: स्नेहावर भडकल्या सुरेखाताई; दादुस देणार का साथ?

sakal_logo
By
स्वाती वेमूल

Bigg Boss Marathi 3: बिग बॉस मराठी ३च्या नुकत्याच पार पडलेल्या भागामध्ये नॉमिनेशन कार्यामुळे सुरेखा कुडची Surekha Kudchi यांची नाराजी सगळ्यांना दिसून आली. त्यांनी ती सगळ्यांसमोर व्यक्तदेखील केली. आता स्नेहा Sneha Wagh, दादुस आणि सुरेखाताई याबद्दल बोलताना दिसणार आहेत. सुरेखाताईंनी त्यांची नाराजी स्पष्टपणे स्नेहासमोर व्यक्त केली. सुरेखाताईंच्या असं बोलण्याने स्नेहा कुठेतरी दुखावली गेली.

“अरे ताई असं का बोलताय”, असं स्नेहा सुरेखाताईंना म्हणाली. तर “या शब्दातच सांगते तुला, आम्हांला तिघांनाही तसं जाणवलं आहे. आपल्याला जेव्हा कोणी नसतं तेव्हा आपण खांदा शोधतो आणि दुसरे मिळाले की ज्या पद्धतीने तू गेलीस...” असं सुरेखाताई म्हणतात. स्नेहाने दादुस यांनादेखील विचारलं, “आता तुम्हाला काही बोलायचे आहे का? मला काही चार शब्द ऐकवायचे आहेत का? तुम्हाला पण असं वाटतं का माझ्याकडे नवीन खांदा आला तर तुम्हाला मी विसरले?" आता दादुस स्नेहाला काय बोलणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.

हेही वाचा: Photos: ऐश्वर्या नारकरांच्या बोल्ड अंदाजापुढे तरुणीही पडतील फिक्या!

बिग बॉसच्या घरामध्ये नॉमिनेशन कार्य पार पडलं. ज्यामध्ये घरातील पाच सदस्य सुरक्षित झाले आणि बाकी सदस्य घराबाहेर जाण्याच्या प्रक्रियेमध्ये नॉमिनेट झाले. तेव्हापासूनच सुरेखा कुडची सदस्यांवर थोड्या नाराज असल्याचं दिसून येत आहे. जीपमध्ये बसण्याची संधी कोणत्या सदस्याला मिळेल यावरून टीम घेत असलेल्या निर्णयावर सुरेखा ताईंनी नाराजी व्यक्त केली.

loading image
go to top