BBM3 : "ती खूप काही शिकवून गेली"; विशाल निकम भावूक

विशालसोबत सोनाली पाटील, मीनल शाह यांनाही अश्रू अनावर
vishak nikam
vishak nikam

Bigg Boss Marathi 3: बिग बॉस मराठीच्या घरातील सदस्यांना शनिवारी खूप मोठा धक्का बसला. शिवलीला पाटीलने प्रकृतीच्या कारणास्तव बिग बॉसच्या घरातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. विशाल निकम, सोनाली पाटील, मीनल शाह यांना अश्रू अनावर झाले. शिवलीलाच्या या निर्णयानंतर विशाल आणि इतर सदस्य त्यांची मतं मांडताना दिसली. याचसोबत दोन दिवस रंगलेल्या बिग बॉसच्या चावडीमध्ये महेश मांजरेकरांनी काहींची कानउघडणी केली, काहींना समजावून सांगितलं तर काही सदस्यांना ते कसे आणि कुठे चुकले हे दाखवून दिलं.

शिवलीलाच्या निर्णयामुळे विशाल अत्यंत भावूक झाल्याचं पहायला मिळालं. सोनाली, मीनल यांच्यासमोर तो भावना व्यक्त करतो. विशाल म्हणाला, “ती असायला हवी होती, खूप काही शिकवून गेली. तिने जो विश्वास दाखवला आहे आपल्यावर, तो कधी नाही मोडणार. काही माणसं दोन दिवसासाठीच आयुष्यात येतात आणि आयुष्यभराची जागा करून जातात, त्यातली ती आहे.” मीनल देखील म्हणाली, “ती कशी होती आपल्यालाच माहिती आहे. तिच्यासारखी मुलगी मी नाही बघितली. तिच्या ज्ञानासमोर कोणीच काही नाहीये."

बिग बॉसच्या घरात असताना शिवलीलाची प्रकृती अचानक बिघडली आणि बुधवारच्या एपिसोडमध्ये बिग बॉसने जाहीर केल्याप्रमाणे वैद्यकीय उपचारांकरिता काही काळ तिला बिग बॉस मराठीच्या घराबाहेर जावं लागलं. त्यानंतर शनिवारी व्हिडीओद्वारे शिवलीलाने शो सोडत असल्याची माहिती दिली.

vishak nikam
किर्तनकार शिवलीला पाटील वादग्रस्त का ठरली?

काय म्हणाली शिवलीला?

"बिग बॉसच्या घरात असताना माझी प्रकृती बिघडली. गोळ्या घेऊन, आराम करून पाहिलं. मात्र तरीही फारसा फरक पडला नाही. अखेर उपचारासाठी मला बिग बॉसच्या घराबाहेर पडावं लागलं. महेश मांजरेकरांनी सूचना दिल्याप्रमाणे मला शोमध्ये खूप चांगली कामगिरी करायची होती. मात्र तब्येत साथ देत नसल्याने मी घरात पुन्हा येऊ शकत नाही. गेल्या काही दिवसांत विशाल, मीनल, सोनाली यांच्यासोबत माझी चांगली गट्टी जमली. घरातील इतर स्पर्धकांना मी त्यांच्या तब्येतीची काळजी घेण्याची विनंती करते", असं ती म्हणाली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com