ती आली अन् गेली.. बिग बॉस मराठीच्या घरातून नीथा शेट्टी बाहेर | Bigg Boss Marathi 3 | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Neetha Shetty

 ती आली अन् गेली.. बिग बॉस मराठीच्या घरातून नीथा शेट्टी बाहेर

sakal_logo
By
स्वाती वेमूल

Bigg Boss Marathi 3 बिग बॉस मराठीच्या घरामध्ये गेल्या आठवड्यात बालदिन साजरा झाला. यानिमित कलर्स मराठी परिवरातील दोन चिमुकल्या सदस्यांनी सदस्यांची भेट घेतली. जय जय स्वामी समर्थ मालिकेतील कृष्णप्पा आणि सोमनाथ या दोघांनी घरातील सदस्यांसोबत बरीच धम्माल मस्ती केली. लहानपणीच्या गोड आठवणी सदस्यांनी सांगितल्या. तर सदस्यांच्या धम्माल नकलांनी बिग बॉसची चावडी रंगली. बिग बॉसच्या चावडीमध्ये VOOT द्वारे आलेल्या फॅन्सची चुगली चुगली बूथद्वारे मीनलने सांगितली. दादूस, विकास आणि विशाल यांनी बिग बॉसच्या चावडीमध्ये VOOT द्वारे आलेल्या प्रेक्षकांची अतरंगी डिमांड पूर्ण केली.

या आठवड्यात नॉमिनेशनमध्ये आलेल्या सदस्यांमध्ये जय, विशाल, आणि दादूस सेफ आहेत असे महेश मांजरेकर यांनी सांगितले. त्यामुळे नीथा, सोनाली, उत्कर्ष आणि विकास या चौघांमधून कोणाला घराबाहेर जावं लागेल हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक खूपच उत्सुक होते. नीथा आणि सोनाली हे दोन सदस्य डेंजर झोनमध्ये आले आणि नीथा शेट्टी – साळवी Neetha Shetty हिला गेल्या आठवड्यात बिग बॉस मराठीच्या घरामधून बाहेर जावं लागलं.

हेही वाचा: 'हा' आहे बिग बॉसच्या आवाजामागचा चेहरा

नीथा शेट्टी हिने अनेक मराठी आणि हिंदी टीव्ही शोमध्ये काम केलं आहे. तिने 'तुम बिन जाने कहां', 'रात होने को है', 'कहीं तो होगा', 'घर की लक्ष्मी बेटियाँ', 'बनू में तेरी दुल्हन', 'ममता', 'सीआयडी', 'पेशवा बाजीराव', 'मेरी हनीकारक बीवी', 'लाल इश्क' अशा हिंदी मालिकांमध्ये काम केलं आहे. तर ती 'फुगे' आणि 'तुला कळणार नाही' या चित्रपटांमध्ये दिसली होती.

loading image
go to top