विशाल-शिवलीलाचा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत | Vishal Nikam & Shivleela Patil | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shivleela Patil and Vishal Nikam

विशाल-शिवलीलाचा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत

बिग बॉस मराठीचं तिसरं पर्व (Bigg Boss Marathi 3) चांगलंच गाजलं. अभिनेता विशाल निकमने (Vishal Nikam) ट्रॉफीवर आपलं नाव कोरत २६ डिसेंबर रोजी या पर्वाने प्रेक्षकांचा निरोप घेतला. बिग बॉसच्या घरात विशालची किर्तनकार शिवलीला पाटील (Shivleela Patil) यांच्यासोबत चांगली मैत्री झाली. घराबाहेर पडल्यानंतर सर्वांत आधी त्यांचीच भेट घेणार असल्याचा शब्द विशालने दिला होता. अखेर त्याने हा शब्द पाळला आहे. पंढरपुरात विशालने शिवलीला यांची भेट घेतली. या भेटीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

'बिग बॉसच्या घरामध्ये मी बोललो होतो, पहिलं जर कोणाला भेटीन तर शिवलीला यांना आणि आज आमची भेट झाली ती सुद्धा मार्गशीर्ष महिन्यात.. माऊलींच्या पंढरपुरात! ही भेट माऊलींनीच घडवून आणली असावी,' अशी पोस्ट विशालने लिहिली. यासोबतच त्याने शिवलीला यांच्यासोबतचा व्हिडीओसुद्धा पोस्ट केला आहे.

हेही वाचा: 'बिग बॉस मराठी'चा चौथा सिझन 'या' महिन्यात होणार लाँच?

शिवलीला पाटील यांनी प्रकृतीच्या कारणास्तव बिग बॉसच्या घरातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी विशाल निकम, सोनाली पाटील, मीनल शाह यांना अश्रू अनावर झाले होते. “ती असायला हवी होती, खूप काही शिकवून गेली. तिने जो विश्वास दाखवला आहे आपल्यावर, तो कधी नाही मोडणार. काही माणसं दोन दिवसासाठीच आयुष्यात येतात आणि आयुष्यभराची जागा करून जातात, त्यातली ती आहे”, अशा शब्दांत विशालने भावना व्यक्त केल्या होत्या.

बिग बॉसच्या घरात पहिल्या दिवसापासून शिवलीला विविध कारणांमुळे चर्चेत राहिल्या होत्या. किर्तनकार शिवलीला यांनी बिग बॉससारख्या शोमध्ये भाग घेऊन चुकीचा निर्णय घेतला असं म्हणत नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं होतं. "तुम्ही इतरांना ज्ञान शिकवता आणि स्वत: असा निर्णय घेता, हे चुकीचं आहे", अशा शब्दांत शिवलीलावर टीका करण्यात आली होती.

Web Title: Bigg Boss Marathi 3 Winner Vishal Nikam Meets Shivleela Patil

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top