अखेर विशालने कबूल केलं 'सौंदर्या'बद्दलचं सत्य; चाहत्यांना केली विनंती

'इंडस्ट्रीतील कोणत्याही व्यक्तीसोबत माझं नाव कृपया जुळवू नका. कारण..'
Vishal Nikam, Bigg Boss Marathi 3 winner
Vishal Nikam, Bigg Boss Marathi 3 winnerInstagram

बिग बॉस मराठी सिझन ३ चा (Bigg Boss Marathi 3) विजेता विशाल निकमने (Vishhal Nikam) एका तरुणीला डेट करत असल्याचं बिग बॉगच्या घरात जाहीर केलं होतं. विशालची 'सौंदर्या' (Soundarya) नेमकी कोण आहे, याविषयी त्याच्या चाहत्यांमध्ये कुतुहल निर्माण झालं. काही चाहत्यांनी सोशल मीडियावर तिला शोधण्याचा प्रयत्न केला. तर काहींनी विशालचं नाव त्याच्या सहकलाकारांसोबत जोडलं. 'साता जन्माच्या गाठी' या मालिकेतील अभिनेत्री अक्षया हिंदळकरला विशाल डेट करत असल्याच्याही चर्चा सुरू झाल्या. या सर्व चर्चांच्या पार्श्वभूमीवर अखेर विशालने सोशल मीडियावर पोस्ट लिहित चाहत्यांना विनंती केली आहे.

विशालची पोस्ट-

'एक नम्र विनंती, मी यापूर्वी सांगितल्याप्रमाणे योग्य वेळ आल्यावर काही खासगी गोष्टी सुरळीत झाल्यावर स्वतःहून 'सौंदर्या'चं नाव सांगेन. ती एक सामान्य मुलगी असून अभिनयसृष्टीशी तिचा काही एक संबंध नाही, त्यामुळे इंडस्ट्रीतील कोणत्याही व्यक्तीसोबत माझं नाव कृपया जुळवू नका. कारण यामुळे विनाकारण त्या व्यक्तीला त्रास होऊ शकतो हे लक्षात घ्या आणि प्लिज धीर धरा. मला थोडं वेळ द्या,' अशी विनंती विशालने केली आहे.

Vishal Nikam, Bigg Boss Marathi 3 winner
'मन उडू उडू झालं' मालिकेत मोठा ट्विस्ट

विशाल निकमने बिग बॉसच्या घरात असताना सौंदर्याचा उल्लेख केला होता. तेव्हापासून चाहत्यांमध्ये या नावाची चर्चा सुरू झाली. सांगलीच्या विशालने 'बिग बॉस मराठी' या लोकप्रिय शोच्या तिसऱ्या सिझनचं विजेतेपद पटकावलं असून त्याला बिग बॉसची ट्रॉफी आणि २० लाख रुपयांचा धनादेश मिळाला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com