'मन उडू उडू झालं' मालिकेत मोठा ट्विस्ट | Man Udu Udu Zhala | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Man Udu Udu Zhala

'मन उडू उडू झालं' मालिकेत मोठा ट्विस्ट

झी मराठी वाहिनीवरील 'मन उडू उडू झालं' (Man Udu Udu Zhala) ही मालिका प्रेक्षकांची आवडती आहे. या मालिकेला आणि त्यातील व्यक्तिरेखांना प्रेक्षकांनी सुरुवातीपासूनच पसंती दर्शवली आहे. नुकतंच प्रेक्षकांनी मालिकेत पाहिलं की इंद्राने आपल्या मनातील भावना दिपूसमोर व्यक्त केल्या आणि दिपूने इंद्राच्या भावनांचा स्वीकार देखील केला. पण दिपूने अजून तिच्या मनातील इंद्राबद्दलचं प्रेम इंद्रासमोर व्यक्त केलं नाही आहे.

दुसरीकडे कार्तिक देशपांडे सरांकडे सानिकाचा हात मागण्यासाठी भेटायला येतो पण देशपांडे सर त्याची चांगलीच खरडपट्टी काढतात आणि घरातून हाकलून देतात. त्यामुळे सानिका दुखावते आणि घरात कोणाशीच नीट बोलत नाही आहे. सानिकाचं हे वागणं पाहून बाबा खूप काळजीत आहेत. अशातच ते सानिकासाठी साळगावकरचं स्थळ म्हणून विचार करतात. साळगावकर हाच इंद्रा आहे याची कल्पना देशपांडे सरांना नाही. त्यामुळे दिपूवर प्रेम असलेल्या इंद्राचं स्थळ सानिकासाठी सुचवल्यावर काय गोंधळ होणार हे प्रेक्षकांना आगामी भागात पाहायला मिळेल.

हेही वाचा: विकी-कतरिनाने साजरी केली लग्नानंतरची पहिली 'लोहरी'

या मालिकेतील इंद्रा आणि दिपूची जोडी प्रेक्षकांना खूप आवडतेय. यामध्ये हृता दुर्गुळे आणि अजिंक्य राऊत मुख्य भूमिका साकारत आहेत. मालिका विश्वातील सुप्रसिद्ध दिग्दर्शकाच्या यादीत आघाडीवर असणारे दिग्दर्शक मंदार देवस्थळी या मालिकेचं दिग्दर्शन करत आहेत. 'वादळवाट', 'अवघाचि हा संसार', 'होणार सून मी ह्या घरची', 'फुलपाखरू', या त्यांनी दिग्दर्शिका केलेल्या मालिका अल्पावधीतच लोकप्रिय झाल्या आणि त्यातील व्यक्तिरेखांनी प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलं.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top