'नाराज होऊ नका भावांनो'; विशाल निकमची चाहत्यांना विनंती | Vishal Nikam | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Vishhal Nikam

'नाराज होऊ नका भावांनो'; विशाल निकमची चाहत्यांना विनंती

महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून कोविड-19 रुग्णांमध्ये वाढ होत आहे आणि अनेक सेलिब्रिटी त्याबद्दल जनजागृती करत आहेत. बिग बॉस मराठी 3चा विजेता विशाल निकम (Vishal Nikam) आणि मीनल शाह (Meenal Shah) यांनीदेखील चाहत्यांना विशेष आवाहन केलं आहे. विशाल निकमने त्याच्या चाहत्यांना नवीन वर्ष साजरा करण्यासाठी बाहेर न जाण्याचं आवाहन केलं आहे. नवीन वर्षाचं सेलिब्रेशन घरच्या घरीच करा, अशी विनंती त्याने सोशल मीडियाद्वारे केली आहे.

विशाल निकमची पोस्ट-

'जिंकल्याचा उत्साह आहे, आनंद आहे, मोठ्या संख्येने तुम्ही मला भेटायला येत आहेत, तुमचं नेहमीच स्वागत! मात्र, मित्रांनो काही दिवस ब्रेक घेऊयात, महाराष्ट्र सरकारच्या निर्देशांचं पालन करूयात. आपल्याला कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखायचा आहे, सदृढ महाराष्ट्र घडवायचा आहे. त्यामुळे आजपासून तीन दिवस एकमेकांपासून दूर राहुयात. ऑनलाईन भेटीगाठी तर होतच राहतील, सोशल डिस्टन्सिंग तेवढं काही दिवस पाळुयात. तर मग आपलं ठरलं प्रसारमाध्यमे आणि सर्व चाहत्यांना मी ऑफलाईन नव्हे तर ऑनलाईन भेटीन! नाराज होऊ नका भावांनो, जबाबदारी आहे, काटेकोरपणे पालन करूयात,' अशी पोस्ट त्याने लिहिली आहे.

हेही वाचा: महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांची नात विकी कौशलच्या भावाला करतेय डेट?

दुसरीकडे 'रोडीज फेम' आणि बिग बॉस मराठी ३ ची फायनलिस्ट मीनल शाहनेदेखील तिच्या चाहत्यांना नवीन वर्ष साधेपणानं साजरा करण्याचं आवाहन केलं. मीनलने लिहिलं, "मित्रांनो, कृपया नवीन वर्षाचं सेलिब्रेशन घरीच करा आणि घरी रहा. कुटुंबीयांसोबत वेळ घालवा आणि सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा."

राज्यात कोरोनाबाधितांची संख्या पुन्हा वेगाने वाढू लागल्याने चिंता व्यक्त होऊ लागली असून रुग्णवाढीचा दर असाच वाढत राहिल्यास जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यात परिस्थिती गंभीर स्वरूप धारण करू शकते, असा इशारा देण्यात आला आहे.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top