Bigg Boss Marathi 4 Winner : शेवटी 'मास्टर माईंड' किरण माने बाहेर! 'गेम ओव्हर'

बिग बॉस मराठीच्या ग्रँड फिनालेचा खेळ भलताच रंगतदार होताना दिसतो आहे. त्यात वेगवेगळ्या घडामोडी घडताना दिसत आहेत.
kiran mane is Bigg Boss Marathi 4 winner
kiran mane is Bigg Boss Marathi 4 winnersakal

Bigg Boss Marathi 4 Kiran Mane Eliminated: बिग बॉस मराठीच्या ग्रँड फिनालेचा खेळ भलताच रंगतदार होताना दिसतो आहे. त्यात वेगवेगळ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. आतापर्यत राखी सावंत, अमृता धोंगडे या घराबाहेर गेल्या आहेत. त्यानंतर आणखी एक मोठा झटका प्रेक्षकांना बसला आहे. तो म्हणजे ज्याला बिग बॉसमधील मास्टर माईंड म्हटलं जात होत तो खेळाडू आऊट झाला आहे.

किरण माने घराबाहेर पडला आहे. त्याला प्रेक्षकांकडून फारसा कौल मिळाला नाही. बिग बॉसमधील बाकीच्या स्पर्धकांना किरणवर पूर्ण विश्वास होता मात्र तसे झाले नाही. अक्षय केळकर, अपूर्वा नेमळेकर यांच्या सोबत त्याचा फार काळ निभाव लागला नाही. मात्र यासगळ्यात शंभर दिवसांहून अधिक काळ बिग बॉसच्या घरात असणाऱ्या किरणनं भावूक होत बिग बॉसचा निरोप घेतला आहे.

बिग बॉसमध्ये सर्वात हुशार चतुर खेळाडू होता तो म्हणजे किरण माने. किरण अत्यंत शिताफीने हा डाव खेळला. अगदी कुठेही आरडाओरड न करता, कुठे भांडण करता तो उत्तम पद्धतीने खेळला. सुरवातीला तो अग्रेसिव्ह होता, पण नंतर शांत माणसं या खेळात जिंकतात म्हणून त्यांने आपली खेळी बदलली.

किरणनं कुणाशी भांडणं झाली नाहीत असं नाही त्याचे अपूर्वाशीही भांडण झाले. पण त्याने सगळ्या सदस्यांशी जवळचे संबंध जोपासले होते. किरणच्या जाण्यानं त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. तो विजेता होईल असा अंदाज चाहत्यांनी बांधला होता. मात्र तसे झाले नाही.

मांजरेकर यांनी जेव्हा मेघा घाडगेला तुला या शो मध्ये कोण जिंकेल असे विचारले होते तेव्हा तिनं किरण माने यांचे नाव घेतले होते. काहीही झालं तरी किरण माने हाच विजेता होणार असल्याचे सांगून चाहत्यांना मोठा आधार दिला होता. मात्र माने बाहेर पडल्यानं त्याच्या चाहत्यांची मोठी निराशा झाली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com