सातारला, कोल्हापुरला की... बिग बॉसची ट्रॉफी जाणार कुठं? | Bigg Boss Marathi 4 Finale | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bigg Boss Marathi 4: Kiran Mane Message To public...emotional note

Bigg Boss Marathi 4 Finale : सातारला, कोल्हापुरला की... बिग बॉसची ट्रॉफी जाणार कुठं?

Bigg Boss Marathi 4 Finale satara kiran mane mumbai : टीव्ही मराठी मनोरंजन विश्वामध्ये आपल्या नावाची वेगळी ओळख असणारा मराठी बिग बॉस हा आता शेवटाकडे आला आहे. आज त्याचा ग्रँड फिनाले आहे. यासगळ्यात अंतिम फेरीतील पाच स्पर्धकांकडे सगळयांचे लक्ष लागले आहे. त्यामध्ये आता कोणत्या शहरांमध्ये जाणार याविषयी वेगवेगळया प्रकारची चर्चा रंगली आहे.

राखी सावंत, अपूर्वा नेमळेकर, अमृता धोंगडे, किरण माने आणि अक्षय केळकर यांच्या नावाचा समावेश आहे. त्यामध्ये कोण जिंकणार अशी लाखो चाहत्यांना उत्सुकता आहे. यासगळ्यात चाहत्यांनी आपआपल्या स्पर्धकांच्या बाजुनं जोरदार प्रमोशन सुरु केलं आहे. सातारच्या प्रेक्षकांनी आणि चाहत्यांनी किरण मानेला उस्फुर्त पाठींबा दिला आहे. काही झालं तरी किरण ट्रॉफी आपल्याकडेच आली पाहिजे असं त्याच्या चाहत्यांनी म्हटले आहे.

दुसरीकडे अमृता, अपूर्वा, मुंबईची राखी यांना देखील चाहत्यांनी मोठ्या प्रमाणावर शुभेच्छा देण्यास सुरुवात केली आहे. गेल्या काही दिवसांपासून बिग बॉसची लोकप्रियता वाढल्याचे दिसून आले आहे. राखी सावंतमुळे बिग बॉसमध्ये पुन्हा रंगत आल्याचे नेटकऱ्यांचे म्हणणे आहे. हिंदी बिग बॉसमध्ये देखील राखी अंतिम तीनमध्ये होती.

हेही वाचा: Ved Review : रितेश-जेनेलियाचा प्रेमात पाडणारा 'वेड'! अभिनय, गाणी सगळंच 'लई भारी'

अपूर्वा नेमळेकर आणि किरण माने हे नाव विजेत्यांच्या यादीत आहे. मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरात अपूर्वा नावाची लाट आहे तर ग्रामीण भागात आणि पश्चिम महाराष्ट्रात, साताऱ्यात किरण मानेचे नाव विजेत्यांच्या यादीत आहे.

हेही वाचा: Bigg Boss Marathi 4: आज जिंकणार का शेवंता? पाहा काय म्हणाले अण्णा..

यामध्ये अमृता धोंगडे, राखी सावंत आणि अक्षय केळकर ही नावं कुठेच दिसत नाहीयत. अगदी बिग बॉसच्या माजी सदस्यांनी ही अपूर्वा आणि किरण यांच्याच नावावर शिक्कामोर्तब केली आहे. पण आता ऐनवेळी डाव बदलेल असं दिसत आहे.