स्पर्धकांना मोठा धक्का! आज एकाला नारळ.. कोण असतील टॉप 5?Bigg Boss Marathi 4 | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bigg Boss Marathi 4 mid week Eviction promo viral

Bigg Boss Marathi 4: स्पर्धकांना मोठा धक्का! आज एकाला नारळ.. कोण असतील टॉप 5?

Bigg Boss Marathi 4: बिग बॉस मराठी ४ चं पर्व आता संपत आलं आहे. येत्या रविवारी ८ जानेवारी रोजी बिग बॉसचा फिनाले आहे. सोळा स्पर्धकांसोबत सुरु झालेला हा प्रवास आता सहा स्पर्धकांवर आला आहे. पण दरम्यान आता एक प्रोमो व्हायरल झाल्यानं स्पर्धकांनाच नाही तर शो च्या चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला आहे. (Bigg Boss Marathi 4 mid week Eviction promo viral)

हेही वाचा: Shahrukh Khan: एका महिन्यात किती कमावतो शाहरुख?, नेटकऱ्याच्या प्रश्नावर किंग खाननं दिलं 'हे' उत्तर

मिड वीक एविक्शनचा हा प्रोमो आहे. यामुळे घरातून एका स्पर्धकाला बाहेर पडावं लागणार हे स्पष्ट होत आहे. त्यात अमृता धोंगडे ढसाढसा रडताना दिसली यामुळे तर नेमकं कोण घराबाहेर पडणार यावरनं सगळ्यांच्याच डोक्यात गोंधळ सुरु झाला आहे.

प्रोमो मध्ये आपण पाहू शकतो घऱात उरलेले सहा सदस्य म्हणजे अमृता धोंगडे,अक्षय केळकर,आरोह वेलणकर, किरण माने,राखी सावंत,अपूर्वा उभे दिसत आहेत. त्यात अपूर्वा अंतिम फेरीत गेली असल्यानं एव्हिक्शनचा धोका उरलेल्या सदस्यांना. सगळ्यांच्या चेहऱ्यावर श़ॉकिंग हावभाव दिसतच आहेत आणि अमृता धोंगडे तर ढसाढसा रडताना दिसत आहे.

हेही वाचा: Hollywood: रोमिओ-ज्युलिएटने तरुणपणातील लैंगिक अत्याचाराचा म्हातारपणात केला खुलासा..

आपण टॉप ५ मध्ये जाणारच...आपण त्यासाठी पात्र आहोत असं देखील ती जोरजोरात म्हणताना दिसत आहे. त्यात किरण माने घराच्या दरवाजाच्या दिशेने जाताना दिसत आहेत. आता प्रोमोमध्ये हे सगळं पाहिल्यानंतर टॉप ५ मध्ये कोण गेलं आणि घराबाहेर कोण पडलं याची मात्र उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे.