Bigg Boss Marathi 4: डाव यशस्वी! बिग बॉसच्या घरात मोठी फुट.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bigg Boss Marathi 4 yashshree rohit and ruchita forms new group

Bigg Boss Marathi 4: डाव यशस्वी! बिग बॉसच्या घरात मोठी फुट..

Bigg Boss Marathi 4: सध्या बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वात दोन टीम पडलेल्या आहेत. या दोन्ही ग्रुपमध्ये प्रचंड चुरस आहे. जेवढी खेळाची चुरस आहेत तेवढीच वैयक्तिक ठसण आणि राग देखील आहे. त्यांचे विचार परस्पर विरोधी असल्याने आजवर या दोन्ही ग्रुप मध्ये अनेक राडे झाले आहेत. पण आता या दोन ग्रुपमधून फुट पडून तिसराच ग्रुप तयार होणार आहे. आजच्या भागात त्याची चर्चा होताना दिसणार आहे.

हेही वाचा: Malaika Arora: बाई, नवीन कपडे घे आता.. जम्पसूट वरुन मलायका झाली ट्रोल!

बिग बॉस मराठी'चा (bigg boss marathi 4) खेळ म्हणजे टास्क, वाद, भांडण आणि राडे. बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वाला सुरुवात होऊन महिना उलटला आहे. त्यामुळे आता खरी मजा घेऊ लागली आहे. कोण आपल्यावर गेम करतंय, कोण मनापासून साथ देतय याची प्रचिती स्पर्धकांना येऊ लागली आहे. आता एकमेकांना मित्र - मैत्रिणी म्हणवणाऱ्या सदस्यांमध्येच फूट पडताना दिसणार आहे. आज मोठी खेळी बिग बॉसच्या घरात होणार आहे.

हेही वाचा: Subodh Bhave Birthday: अभिनय जमत नाही म्हणून नाटकातून काढलं होतं सुबोधला आणि आज..

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आज यशश्री, रोहित आणि रुचिरा नवा ग्रुप तयार व्हावा यावर चर्चा करताना दिसणार आहेत... यशश्रीचे म्हणणे आहे, 'मला एक कळत नाहीये जेव्हा सॅम आली होती तुमच्याकडे प्रोपोसल घेऊन कि आपण एक वेगळा ग्रुप तयार करूयात… पण त्याच्या आधीपासून माझ्या डोक्यात होतं ते. मी जेव्हा या ग्रुपमध्ये गेले होते... तेजू, अमृता, तू, मी आणि रोहित असा एक वेगळा ग्रुप असावा त्यात सॅम नव्हती कुठेही.'

हेही वाचा: Nana Patekar: 'मी टू'च्या आरोपानंतर नाना पाटेकर यांचे दमदार पदार्पण! येतेय'लाल बत्ती'..

पुढे ती म्हणते, 'सॅम जरी म्हणत असली ती वैयक्तिक खेळते तरी तिचा कल त्या ग्रुपकडे खूप जास्त आहे आणि ते तिला कधीपण परत खेचून आणू शकतात हे मी पाहिलं आहे. मला असं वाटतं तुम्हालाही खूप ग्रांटेड घेतलं जातं आणि सगळ्याच बाबतीत कि, जेव्हा हवं तेव्हा आपण त्यांना परत खेचून आणू शकतो. रुचिराचे त्यावर म्हणणे आहे, म्हणजे नॉमिनेट करायला आम्ही पाहिजे पण आमची कॅप्टीन्सी, किंवा कंटेनरशिप गेली तर हे असताना कशी गेली? तिथे त्यांनी ती जपून ठेवली पाहिजे, पण यांना नॉमिनेट करताना आम्ही करू शकतो.' आता रुचिराचा नक्की काय मुद्दा आहे, नक्की कधी नवा ग्रुप होणार हे आजच्या भागात कळेल.

टॅग्स :Big Bossbigg boss marathi