esakal | शिव ठाकरेचा मास्कविना लोकल प्रवास; सोशल मीडियावर झाला ट्रोल

बोलून बातमी शोधा

shiv thakare}

सेलिब्रेटींनीच जर नियमाचे उल्लंघन  केले नाही तर समाजात चुकीचा संदेश पोहोचू शकतो.

manoranjan
शिव ठाकरेचा मास्कविना लोकल प्रवास; सोशल मीडियावर झाला ट्रोल
sakal_logo
By
सकाळ ऑनलाइन

बिग बॉस मराठीचा विजेता शिव ठाकरे हा वेगवेगळ्या रिअॅलिटी शोमुळे नेहमीच चर्चेत असतो. त्याच्या फिटनेसमुळे त्याचे फॅन्स त्याला फॉलो करतात. काही दिवसांपूर्वी शिवने स्वत:च्या बी-रियल नावाच्या ब्रॅन्डची घोषणा केली. शिव सोशल मीडियावर सक्रिय असतो. वेगवेगळ्या लूक मधील फोटोशूटचे फोटो तो  सोशल मीडियीवर शेअर करतो. नुकताच एका हटके फोटोशूटचा फोटो शिवने सोशल मीडियावर शेअर केला आहे. मात्र यावरून नेटकरी त्याला ट्रोल करतायत. 

या फोटोमध्ये शिव रेल्वेतून प्रवास करताना तृतीयपंथीयांसोबत गप्पा मारताना दिसत आहे. या फोटोमध्ये शिव पांढऱ्या रंगाचा शर्ट आणि काळ्या पँटमध्ये दिसत असून त्याचा लूक फॉर्मल आहे. 'Blessed conversation' असं कॅप्शन देत शिवनं हा फोटो शेअर केला आहे. फोटोमध्ये शिवने मास्क घातला नसल्याने काही जणांनी याबाबत त्याला सोशल मीडियावर प्रश्न विचारले आहे. या फोटोमधील तृतीयपंथीयांनी देखील मास्क घातले नाही. 

हेही वाचा : 'देव तुमच्यावर ही वेळ आणू नये'; लग्नाबद्दल विचारणाऱ्यांना अभिज्ञा भावेचं उत्तर 

सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरणे या नियमाचे पालन कोरोनाच्या काळात सर्वजण करत आहेत. पण सेलिब्रेटींनीच जर नियमाचे उल्लंघन  केले नाही तर समाजात चुकीचा संदेश पोहोचू शकतो. त्यामुळे शिवला सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे.