Bigg Boss OTT 2: बिग बॉसचं घर कमी अन् 'वधू-वर सूचक केंद्र' जास्त! आणखी एका लव्ह बर्ड्सची चर्चा

Bigg Boss OTT 2:
Bigg Boss OTT 2: Esakal

ओटीटी बिग बॉसची सध्या मनोरंजन विश्वात जोरदार चर्चा आहे. लोकप्रिय आणि तितकाच वादग्रस्त असलेल्या या शोमध्ये आता रोजच नवनवे ट्विस्ट येत आहेत. बिग बॉसच्या घरात वाईल्ड कार्डमध्ये आलेले स्पर्धक शो चांगलाच गाजवत आहे. त्यातच एल्विश यादवने तर काही दिवसांत लोकप्रियता मिळवली आणि पुर्ण घरचं दणाणून सोडलं आहे.

Bigg Boss OTT 2:
Taapsee Pannu: 'प्रेग्नेंट नाही म्हणुन लग्न....', तापसी जेव्हाही बोलते तेव्हा चर्चाच होतेच

काल घरात बीबी हेल्थ चेकअप'चे टास्क पाहिले. या टास्कनंतर आशिका अविनाश यांच्यात राडाही झाला. एल्विशचे फलक नाज, जिया शंकर आणि अविनाश सचदेव यांच्यात तर भयंकर वादही झाला. तर शोमध्ये नॉमिनेशन टास्कही झाले. ज्यात 'भूखा शेर' टास्क करण्यात आला होता.

या टास्कमध्ये शेवटी, एल्विश यादव, आशिका भाटिया, अविनाश सचदेव, फलक नाझ, जैद हदीद आणि जिया शंकर यांना या आठवड्यात नॉमिनेट करण्यात आलं आहे.

एकीकडे नॉमिनेशनमुळे वातावरण तापलं असतांना दुसरीकडे तर घरात पुन्हा प्रेमाचे वारे वाहत आहेत. यापुर्वी घरात फलक नाज आणि अविनाश सचदेव यांच्यात काही तरी शिजतयं असं चित्र होतं. अविनाश सचदेवने फलकला त्याच्या मनातली भावनाही सांगितल्या मात्र फलकने त्याच्या प्रेमाला नकार दिला. त्यामुळे ही लव्हस्टोरी पुढे सरकली नाही असं दिसतयं.

Bigg Boss OTT 2:
Aditya Roy Kapoor-Ananya : तो 'हो' म्हणाला, मी 'नाही' का म्हणू?

तर दुसरीकडे घरात आणखी एक जोडी चर्चेत आली आहे. एल्विश यादव आणि मनीषा राणी यांच्या केमिस्ट्रीने सर्वांनाच धक्का दिला आहे.

सध्या सोशल मिडियावर व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यात एल्विश यादव आणि मनीषा राणी हे हातात हात घेवुन घरात फिरतांना दिसत आहे. दोघांना हातात हात घालून फिरताना पाहून बेबिका धुर्वे यांची प्रतिक्रियाही दिली.

या व्हिडिओत एल्विशने मनीषाचा हात धरला आणि तो पुजा भट्टचा आशीर्वाद घेतला. बाबिका धुर्वेने 'प्रीतीने धोखा दिला. घरातील सदस्यांनी देखील या जोडीवर खुप कमेंट केल्या तर दुसरीकडे नेटकऱ्यांनीही या व्हिडिओवर प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी बिग बॉसमध्ये फक्त जोड्या जुळतात असा टोमणाही मारला आहे.

Bigg Boss OTT 2:
Oonchi Oonchi Waadi: भाबडा भक्त अन् भोळा शंकर, OMG 2 मधलं पहिलं गाणं भेटीला

तर दुसरीकडे जिया शंकरच्या मनात देखील प्रेमाचा बहर आलेला दिसत आहे. जिया शंकरला अभिषेक मल्हानबद्दल भावना असल्याचं दिसतयं. वीकेंड का वारमध्ये दोघांचा रोमँटिक डान्स व्हिडिओ नेटकऱ्यांना आवडला होता. तर अभिषेक आशिका भाटियासोबत फ्लर्ट करतांना दिसला. त्यामुळे आता घरात आणखी किती नवीन जोड्या जुळतात हे तर येणाऱ्या काही भागात दिसेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com