esakal | "..तर एअरपोर्टवर विवस्त्रच गेले असते"; ट्रोलर्सना अभिनेत्रीचं उत्तर
sakal

बोलून बातमी शोधा

Urfi Javed

"..तर एअरपोर्टवर विवस्त्रच गेले असते"; ट्रोलर्सना अभिनेत्रीचं उत्तर

sakal_logo
By
स्वाती वेमूल

टीव्ही अभिनेत्री उर्फी जावेद Urfi Javed सध्या सोशल मीडियावर ट्रोलर्सच्या निशाण्यावर आहे. 'बिग बॉस ओटीटी'मधून Bigg Boss OTT बाद होणारी उर्फी ही पहिली स्पर्धक ठरली. बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर ती मुंबईत परतली. यावेळी मुंबई विमानतळावर पापाराझींनी तिचे काही फोटो काढले आणि सोशल मीडियावर अपलोड केले. उर्फीच्या एअरपोर्ट लूकवरूनच तिला ट्रोल केलं जातंय. उर्फीने क्रॉप डेनिम जॅकेट आणि त्यावर निळ्या रंगाची जीन्स परिधान केली होती. पब्लिसिटीसाठी तिने असे कपडे परिधान केले, अशी टीका नेटकऱ्यांनी तिच्यावर केली. या टीकाकारांना उर्फीने सडेतोड उत्तर दिलं आहे.

ई टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत उर्फी म्हणाली, "मला खरंच पब्लिसिटी पाहिजे असती तर मी विवस्त्रच गेले असते. मी अशीच आहे आणि त्याने जर पब्लिसिटी मिळत असेल तर माझ्यासाठी ते चांगलंच आहे. कपड्यांशिवाय अशा अनेक गोष्टी आहेत ज्यावर तुम्ही बोलू शकता. एक व्यक्ती म्हणून मी कशी आहे, यावर कधी लोकं का नाही बोलत? बिकिनी असो किंवा मग सलवार सूट, नेटकरी ट्रोल करणारच."

हेही वाचा: "गोविंदा मामा असेल तर मी काम नाही करणार"; कृष्णा अभिषेकचा साफ नकार

उर्फीने 'बडे भैय्या की दुल्हनियाँ', 'मेरी दुर्गा', 'बेपनाह', 'चंद्रनंदिनी', 'डायन', 'ये रिश्ता क्या कहलाता है' अशा मालिकांमध्ये काम केलं आहे. २०१६ पासून तिने अभिनय क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली.

loading image
go to top