esakal | बिग बॉसची विजेती हॉस्पिटलमध्ये पुसतेय फरशी
sakal

बोलून बातमी शोधा

बिग बॉसची विजेती हॉस्पिटलमध्ये पुसतेय फरशी

बिग बॉसची विजेती हॉस्पिटलमध्ये पुसतेय फरशी

sakal_logo
By
युगंधर ताजणे

मुंबई - कुणाला सांगितलं तर खरं वाटणार नाही. पण जेव्हा तुम्ही ते फोटो पाहाल तेव्हा तुमचा विश्वास बसल्याशिवाय राहणार नाही. बिग बॉस हा मनोरंजन क्षेत्रातील सर्वात जास्त प्रेक्षकवर्ग असणारा शो आहे. त्याला मिळणारा प्रतिसादही मोठा आहे. आतापर्यत या शो चे 14 हून अधिक पर्व झाले आहेत. त्यावरुन त्याच्या लोकप्रियतेची कल्पना येते. वाद, भांडणं, आरोप प्रत्यारोप, संघर्ष, मैत्री, प्रेम या साऱ्या गोष्टी बिग बॉसमध्ये पाहायला मिळतात. या शो मध्ये विजेत्या झालेल्या स्पर्धकांना मोठया प्रमाणावर लोकप्रियता मिळते. पैसेही मिळतात. मात्र पैशांच्या हव्यासापोटी काही कलाकार काय करतील याचा भरवसा नसतो. आता असाच एक प्रकार समोर आला आहे. आणि तो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

बिग बॉसचा 15 वा सीझन सर्वाधिक चर्चेत आला आहे. त्यात सहभागी झालेले स्पर्धक यामुळे बिग बॉसची चर्चा आहे. दरम्यानच्या काळात एक फोटो व्हायरल झाला आहे. त्यात एक सावळ्या रंगाची, मोठ्या दातांची, निळ्या रंगाची साडी परिधान केलेली महिला कर्मचारी एका रुग्णालयामध्ये फरशी पुसण्याचे काम करत आहे. ती कुणी सफाई कामगार नसून बिग बॉसची स्पर्धक आहे. कुणाला कधी वाटलंही नसेल की ती बिग बॉसमधील विजेती स्पर्धक आहे आणि आता ती अशी दिसतेय. एवढी सुंदर स्पर्धक अशी का झालीये, असा प्रश्न चाहत्यांना तिला पाहिल्यानंतर पडला. अनेकांनी बऱ्याचवेळा तो फोटो पाहूनही त्यांना त्याबद्दल काही सुचलं नाही. काहींनी वेगवेगळ्या प्रकारे अंदाजही व्यक्त केलाय.

त्या रुग्णालयामध्ये फरशी पुसण्याचे काम कऱणारी ती कर्मचारी बिग बॉसची विजेती आहे. आणि तिचं नाव दिव्या अग्रवाल असं आहे. बिग बॉसच्या ओटीटीची विजेती म्हणून ती सर्वांना आता माहिती झाली आहे. सध्या ती एकता कपूरच्या कार्टेलमध्येही काम करते आहे. त्यामुळे ती वेगवेगळ्या रुपात फोटोशुट करुन चाहत्यांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. यापूर्वी देखील एका म्हाताऱ्याचा फोटो व्हायरल झाला होता. त्यात तो व्यक्ती कोण आहे हे काही प्रेक्षकांना समजल नाही. तो म्हातारा दुसरा तिसरा कोण नसून दिव्याच होती.

हेही वाचा: खबरदार, वन मोअर टेक म्हणाला तर... सुपरस्टारला होतं खडसावलं

loading image
go to top