झाडू घेऊन लागली सगळ्यांच्या मागे, राखीची दहशत

बेभान होत समोरच्याला आपल्या बोलण्यानं गारद करणारी सेलिब्रेटी, अभिनेत्री म्हणून राखीला चाहते ओळखतात.
झाडू घेऊन लागली सगळ्यांच्या मागे, राखीची दहशत

मुंबई - बेभान होत समोरच्याला आपल्या बोलण्यानं गारद करणारी सेलिब्रेटी, अभिनेत्री म्हणून राखीला चाहते ओळखतात. बिग बॉसच्या गेल्या पर्वामध्ये राखीनं कमाल केली होती. तिला त्यावेळी प्रेक्षकांची मोठ्या प्रमाणावर लोकप्रियता मिळवली होती. आताही बिग बॉसच्या यंदाच्या सीझनमध्ये राखी तिच्या पतीसह रितेशबरोबर सहभागी झाली आहे. तिच्याबरोबर इतर काही स्पर्धकांची रॉयल एंट्री बिग बॉसमध्ये झाली आहे. त्यात राखीनं आपल्या रोखठोक स्वभावानं पुन्हा एकदा दहशत निर्माण केली आहे. सध्या तिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

बिग बॉसच्या 15 व्या सीझनमध्ये राखी अधिक आक्रमक झाली आहे. तिनं गेल्या काही दिवसांपासून आपली दहशत तयार करण्यास सुरुवातही केली आहे. आता व्हायरल झालेल्या प्रोमोमध्ये राखीनं हातात झाडू घेतला आहे आणि ती काही स्पर्धकांच्या मागे लागली आहे. त्यांच्यावर ती ओरडतही आहे. नुकतंच तिचं काही स्पर्धकांशी जोरदार भांडणही झालं होतं. त्याला कारण होतं तिचा पती रितेश. त्याला अभिजित बिचुकलेनं भाड्यानं आणलेला पती असं संबोधलं होतं. त्यामुळे रागाला गेलेल्या राखीनं बिग बॉसचं घर डोक्यावर घेतलं होतं. त्या व्हिडिओला देखील प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता.

झाडू घेऊन लागली सगळ्यांच्या मागे, राखीची दहशत
भाडं देऊन आणलेला पती असं म्हणताच, राखी अभिजीतमध्ये जुंपली
झाडू घेऊन लागली सगळ्यांच्या मागे, राखीची दहशत
पती म्हणून राखी सावंतने उभं केलं 'बिग बॉस १५'च्या कॅमेरामनला?

आता स्पर्धकांना अंतिम फेरीचे वेध लागले आहेत. त्याची नावं काही दिवसांनी घोषित केली जाणार आहेत. त्यामुळे प्रत्येकाचा प्रयत्न जास्तीत जास्त लोकप्रियता कॅश करण्याचा आहे. असे बोलले जात आहे. सोशल मीडियावर बिग बॉसच्या आगामी एपिसोडचा एक प्रोमो व्हायरल झाला आहे. त्या प्रोमोमध्ये राजीव अदतिया घरात रडताना दिसत आहे. सध्या बिग बॉसच्या घरात दोन गटांमध्ये तणाव वाढतो आहे. त्याचा परिणाम इतर स्पर्धकांवर होतो आहे. गेल्या काही दिवसांपासून बिग बॉसची लोकप्रियता कमी होत आहे. अशी टीका स्पर्धकांवर झाली होती. त्यामुळे हा शो बंद होणार असेही बोलले जात होते. आता जेव्हा त्या शो मध्ये काही स्पर्धकांची वाईल्ड़ एंट्री झाली तेव्हापासून बिग बॉसचा टीआरपी वाढला आहे. त्यात राखीनं सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com