Bigg Boss 16: 500 कारागीर, 6 महिने 8 तास काम, बिग बॉसचं घर बनवणं अवघड! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bigg Boss 16

Bigg Boss 16: 500 कारागीर, 6 महिने 8 तास काम, बिग बॉसचं घर बनवणं अवघड!

Bigg Boss House Facts: टीव्ही मनोरंजन विश्वामध्ये सर्वाधिक लोकप्रिय असणारा शो म्हणून बिग बॉसकडे पाहिले जाते. आता या रियॅलिटी शोचा 16 वा सीझन सुरु होणार आहे. यावरुन या शो ला मिळणारा प्रतिसाद किती मोठा आहे हे लक्षात (Entertainment News) येईल. बिग बॉसचा चाहतावर्ग मोठा आहे. सोशल मीडियावरुन देखील त्याला मिळणारा प्रतिसाद हा प्रचंड आहे. अशा बिग बॉसच्या (Viral Social Media News) घर साकारणाऱ्या कारागीरांविषयी फार कमी माहिती आहे. त्यांची मेहनत ही नेहमीच सर्वसामान्य वाचक, प्रेक्षक यांच्यासाठी अनोळखी असल्याचे दिसून आले आहे.

बिग बॉसच्या सोळाव्या सीझनचा प्रोमो समोर आला आहे. यंदाच्या शोमध्ये कोण सहभागी होणार, कुणामध्ये चुरशीची लढत होणार हे सगळं यासगळ्याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे. गेल्या काही महिन्यांपासून प्रेक्षक नव्या सीझनची आतुरतेनं वाट पाहत होते. बिग बॉसचं घर कसं साकारलं जातं याविषयी वाचकांना नेहमीच कुतूहल असते. ते घर साकारणारे कारागीर किती, ते कसे काम करतात, किती तास काम करतात याबद्दलची माहिती आपण जाणून घेणार आहोत.

हेही वाचा: Alia-Ranbir: 'आलिया हे शोभलं का तुला?' सगळ्यांसमोर रणबीरसोबत केलं असं काही...

दरवेळी वेगवेगळ्या विषयांवर आधारित थीम ही बिग बॉसच्या घरासाठी असते. यावेळी असं म्हटलं जातं आहे की, एका आगळ्या वेगळ्या विषयावर आधारित यंदाचा बिग बॉसचा सेट अप असणार आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बिग बॉसच्या घराचे इंटेरिअर आणि त्याचे डिझाईन हे विनिता आर्ट, उमंग कुमार यांच्याव्दारे केले जाते. विनिता आणि उमंग हे एकत्रितपणे बिग बॉसच्या घराचे डिझाईन करत असल्याचे सांगितले जाते.

हेही वाचा: Bramhastra: सुशांतचं 'ब्रम्हास्र' बॉलीवूडला करेल भस्म, बहिण मीतूची जळजळीत प्रतिक्रिया

बिग बॉसचं घर तयार करायचं म्हणजे त्याला किमान सहा महिन्यांचा कालावधी लागतो. त्यासाठी 500 ते 600 कामगार दररोज आठ तास काम करत असतात. त्यातून बिग बॉसचे घर तयार होते. जेव्हा सगळे स्पर्धक या घरामध्ये इंट्री करतात तेव्हा त्या घराचा एका दिवसाचा खर्च हा पंधरा ते वीस हजार (खानपान, वीज बिल) एवढा असल्याचे सांगितले जाते.

Web Title: Bigg Boss Season 16 New Set 500 Workers 8 Hours Duty Unknown Facts About Reality Show

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..