सुशांतच्या निधनानंतर बिहारच्या 'या' लोकगायिकेने बॉलीवूड गायन केले बंद 

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 21 June 2020

बिहारमध्ये सुशांतचे चाहते रस्त्यावर उतरले आहेत. तेथील काही स्थानिक कलाकारांनी आता बाॅलीवूडच्या नादी लागायचे नाही असे ठरविले आहे.

मुंबई : सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर संपूर्ण देशातून तीव्र स्वरूपाच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. बिहारमध्ये सुशांतचे चाहते रस्त्यावर उतरले आहेत. तेथील काही स्थानिक कलाकारांनी आता बाॅलीवूडच्या नादी लागायचे नाही असे ठरविले आहे. बिहारमधील प्रसिद्ध लोकगायिका मैथिली ठाकूर हिने यापुढे बॉलीवूडमधील गीते गाणार नसल्याचे जाहीर केले. 

सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर चाहत्यांनी बॉलीवूडमधील मक्तेदारी व घराणेशाहीवर जोरदार टीका केली. बिहारमधील अनेकांनी न्यायालयात धाव घेत बॉलीवूडमधील काही कलाकार आणि निर्मात्यांवर तक्रार दाखल केली. मैथिली ठाकूर आणि ऋषभ ठाकूर हे बहीण व भाऊ आहेत आणि सोशल मीडियावर त्यांच्या गाण्यांचे खूप चाहते आहेत. बिहार, झारखंड तसेच अन्य हिंदी पट्टामध्ये तिच्या गाण्यांना मोठी दाद मिळते. आपला भाऊ ऋषभच्या यू ट्यूब चॅनेलवर तिने हा खुलासा केला आहे. मैथिली व ऋषभ यांनी मिळून अनेक बॉलीवूड कव्हर सॉंग गायले आहेत. मागील वर्षी त्यांच्या यु ट्यूब वाहिनीने जवळपास पावणे दोन मिलियनच्या पुढे प्रेक्षकांनी सबस्क्राईब केले आहे.

फादर्स डे निमित्त रिद्धीमा कपूरला आली वडिलांची आठवण...

मैथिलीने सांगितले की, सुशांतच्या घटनेनंतर मला अंतर्मनातून आवाज येत आहे. मी माझ्या वडिलांसोबत या विषयी चर्चा केली. टीव्ही व सोशल मिडियाच्या माध्यमातून विविध बाबी बॉलीवूडबद्दल ऐकायला मिळाल्या. मी इंस्टावरही असल्याने हजारो चाहत्यांनी त्यांच्या प्रतिक्रिया मला दिसल्या. त्यामुळे आता बाॅलीवूडची गाणी न गाण्याचा निर्णय घेतला आहे.

सुशांतच्या आत्महत्येच्या एका आठवड्यानंतर आली सलमानची प्रतिक्रिया; वाचा काय म्हणाला तो...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bihar folk singer Maithili Thakur announced to not sing in Bollywood