फादर्स डे निमित्त रिद्धीमा कपूरला आली वडिलांची आठवण...

सकाळ न्यूज नेटवर्क
Sunday, 21 June 2020

ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचे 30 एप्रिल रोजी निधन झाले. त्यांच्या निधनामुळे त्यांच्या चाहत्यांना जबरदस्त धक्का बसलाच शिवाय हिंदी चित्रपटसृष्टीतदेखील शोक व्यक्त करण्यात आला. आता त्यांच्या निधनाला लवकरच दोन महिने पूर्ण होतील.

मुंबई : ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचे 30 एप्रिल रोजी निधन झाले. त्यांच्या निधनामुळे त्यांच्या चाहत्यांना जबरदस्त धक्का बसलाच शिवाय हिंदी चित्रपटसृष्टीतदेखील शोक व्यक्त करण्यात आला. आता त्यांच्या निधनाला लवकरच दोन महिने पूर्ण होतील. पण आज त्यांची मुलगी रिद्धीमा कपूरने आपल्या वडिलांसोबतच एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे आणि हॅपी फादर्स डे असे म्हटले आहे.

अरे देवा! दक्षिण मुंबईतल्या 'या' दोन इमारती ठरतायेत कोरोनाचा हॉटस्पॉट...

आज फादर्स डे आहे आणि सोशल मीडियावर अनेक कलाकारांनी आपापल्या वडिलांना फादर्स डेच्या शुभेच्छा दिल्या आहेत. रिद्धीमा कपूरने आपल्या वडिलांचा एक जुना फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे आणि त्यात तिने म्हटले आहे, की पप्पा  मी तुमची नेहमीच आठवण काढते आणि सतत काढत राहीन. पप्पा...हॅपी फादर्स डे...

मुंबईतील क्रीडा साहित्य विक्रेते चीनशी पंगा घेणार; वाचा नेमकं काय करणार ते...

ऋषी कपूर यांचे अंतिम दर्शन लॉकडाऊनमुळे रिद्धीमाला घेता आले नाही. वडिलांचे निधन झाल्याचे कळताच ती दिल्लीहून लगेच निघाली आणि दुसऱ्या दिवशी मुंबईत पोहोचली. रिद्धीमा ज्वेलरी डिझायनर्स आहे. ती दिल्लीत राहते. आपल्या वडिलांची ती खूप लाडकी होती. सतत सोशल मीडियावर ती फोटो टाकीत असते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ridhima kapoor remebers rishi kapoor on fathers day