Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan च्या 'बिल्ली बिल्ली' गाण्याचा टीझर रिलीज, सलमाने पुन्हा दाखवला डान्सचा जलवा...

मंगळवारी सलमान खानने सोशल मीडियावर 'किसी का भाई किसी की जान' च्या बिल्ली बिल्ली गाण्याच्या टीझर रिलीजची माहिती दिली होती.
Salman Khan
Salman KhanSakal

बॉलीवूड सुपरस्टार सलमान खानच्या आगामी 'किसी का भाई किसी की जान' या लेटेस्ट गाण्यातील बिल्ली बिल्ली गाण्याचा टीझर रिलीज झाला आहे. या गाण्यात सलमान खानने आपल्या डान्सिंग स्टाईलने चाहत्यांचे लक्ष केंद्रित केले आहे.

मंगळवारी सलमान खानने सोशल मीडियावर 'किसी का भाई किसी की जान' च्या बिल्ली बिल्ली गाण्याच्या टीझर रिलीजची माहिती दिली होती. अशा परिस्थितीत आता या गाण्याचा टीझर चाहत्यांसाठी उपस्थित आहे.

'बिल्ली बिल्ली' गाण्याच्या टीझरमध्ये सलमान खान आणि पूजा हेगडे व्यतिरिक्त चित्रपटातील इतर स्टारकास्टची झलकही पाहायला मिळणार आहे. सलमान खानच्या 'किसी का भाई किसी की जान' या चित्रपटाची सर्वजण आतुरतेने वाट पाहत असल्याची माहिती आहे.

Salman Khan
Sara Ali Khan Viral photo: 'काय होतीस तू काय झालीस तू', साराचा दाढी मिशीतला फोटो व्हायरल! नेटकरीही घाबरले..

'किसी का भाई किसी की जान' च्या 'बिल्ली बिल्ली' गाण्याचा टीझर समोर आल्यानंतर आता सगळेच या गाण्यासाठी आतुर झाले आहेत. सलमान खानचे हे लेटेस्ट गाणे गुरुवार, २ मार्च रोजी रिलीज होणार आहे.

सलमानच्या आगामी 'किसी का भाई किसी की जान' या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेबद्दल बोलत असताना, 'किसी का भाई किसी की जान' हा चित्रपट यावर्षी एप्रिलमध्ये ईदला प्रदर्शित होणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com