Publicity Stunt: फॅन फॉलोअर्स वाढवण्यासाठी काहीही... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bindass Kavya

Publicity Stunt: फॅन फॉलोअर्स वाढवण्यासाठी काहीही...

हेही वाचा: Bindass Kavya: मिलियन्समध्ये फॉलोअर्स असलेली युट्युबर बिनधास्त काव्या अखेर सापडली

एक युट्युबर रात्रीत अचानक बेपत्ता होते. तिचे आई वडिल तिचा शोध घेण सोडून यासंदर्भात इमोशनल व्हिडिओ बनवतात. तो सोशल मिडियावर टाकतात आणि तो आगीसारखा पसरतो. त्यावर सोशल मिडियावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटल्या. मात्र हे सर्व नाट्य होत.जे फक्त फॅन फॉलोअर्स वाढवण्यासाठी करण्यात आलं होत.

हेही वाचा: Social Media; सोशल मीडियावर व्यक्त होताना काय काळजी घ्यावी?

औरंगाबादमधील फेमस युट्युबर गर्ल बिंदास काव्या अचानक बेपत्ता झाल्यामुळे समाजमाध्यमांवर ती चर्चेचा विषय ठरली होती. तिच्या फॅन्सना तिची चिंताही झाली. तिच्या पालकांनी याबाबत पोलिसांत तक्रारही केली आणि पोलिसांनीही तपास सुरु केला.यानंतर काव्या मध्य प्रदेशच्या इटारसी स्टेशनवर सापडली होती. मात्र काव्या आणि तिच्या कुटुंबाने केवळ फॅन फॉलोअर्स वाढवण्यासाठीच हा खटाटोप केला असल्याचे समोर आले आहे. ज्यावेळी तिला या सगळ्यानंतर कारण विचार असता घरच्यांवर नाराज होऊन ती घरातून निघून गेली असल्याचे शुल्लक कारण सांगितले.

दरम्यान बाल न्याय मंडळाच्या अध्यक्ष अॅड. आशा शेरखाने-कटके यांनी माहिती देत सांगितले की, दर्जाहीन प्रसिद्धीसाठी पोलीस, रेल्वे, बाल न्याय मंडळ या यंत्रणांना वेठीस धरलं गेलं. हा सर्व घटनाक्रम पूर्वनियोजित होता, असं स्पष्ट झालय. नागरिकांना भावनाविवश करून लाइक करण्यास भाग पाडलं गेलं. प्रसिद्धीसाठी यंत्रणेस वेठीस धरणे योग्य नसल्याचं त्या यावेळी म्हणाल्या. निव्वळ फॅन फॉलोअर्स वाढवून पैसे मिळवण्यासाठी कोणत्याही थराला जाणे कितपत योग्य आहे. असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.