Bipasha Basu Daughter Devi: बिपाशाची लेक झाली एक वर्षाची! खास पोस्ट शेयर करत दिल्या देवीला शुभेच्छा

Bipasha Basu Daughter Devi
Bipasha Basu Daughter Devi

Bipasha Basu Daughter Devi Birthday Celebration: बॉलीवूडची सर्वात लोकप्रिय अभिनेत्री बिपाशा बासू ही सध्या तिची लाडकी लेक देवीसोबत वेळ घालवत आहे. बिपाशानं सध्या चित्रपटातून ब्रेक घेतला असला तरी ती सोशल मिडियावर कमालीची सक्रिय आहे.

बिपाशा तिच्या लेकीसोबत वेळ घालवत आहे. बिपाशा आणि करणची लेक देवी आज एक वर्षाची झाली आहे. त्यामुळे आज बिपाशा तिच्या लाडक्या देवीचा पहिला वाढदिवस साजरा करत आहे.

लग्नाच्या पाच वर्षांनी हे दोघे आई-वडील झाले. गेल्या वर्षी 12 नोव्हेंबर रोजी बिपाशा आणि करण सिंग ग्रोवरने मुलीचे स्वागत केले. आता बिपाशा लेकीचा पहिला वाढदिवस साजरा करत आहे. बिपाशानं तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर मुलगी देवीच्या प्री-बर्थडे सेलिब्रेशनचा एक सुंदर व्हिडिओ शेअर केला होता. ज्यामध्ये देवी तिच्या वाढदिवसाचा केक कापताना दिसत होती.

Bipasha Basu Daughter Devi
Salaar: 'डंकी'ला टक्कर द्यायला येतोय 'सलार'! नवीन पोस्टर लॉंच करत प्रभासने केली मोठी घोषणा

आता बिपाशाने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर देवीच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त एक खास फोटो शेअर करत लांबलचक नोट लिहिली आहे. प्रसूतीनंतर लगेच काढलेल्या या फोटोत बिपाशा बेशुद्ध अवस्थेत तिच्या मुलीसोबत दिसत आहे. तर करण सिंग ग्रोव्हर तिला किस करताना दिसत आहे.

Bipasha Basu Daughter Devi
Tiger 3 Release: फक्त टायगरचीच हवा! थिएटर बाहेर सलमानच्या चाहत्यांनी साजरी केली दिवाळी...व्हिडिओ व्हायरल

या पोस्टच्या कॅप्शनमध्ये बिपाशा लिहिते की, "जन्माची जादू... आईच्या गर्भात 9 महिने आणि आता देवी एक वर्षाची आहे. हा काळ आयुष्यातील सर्वात सुंदर काळ आहे. आम्ही आमच्या लहान देवीसोबत पुढे अनेक साहसी काम करण्यासाठी उत्सुक आहेत. तिचा वाढदिवस आणि दिवाळी एकाच दिवशी आहे. ती आपल्यासाठी खरोखरच देवीचा गोड आशीर्वाद आहे. आमची लक्ष्मी देवी. सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा आणि देवीवर करत असलेल्या प्रेमासाठी आणि प्रार्थनांसाठी धन्यवाद."

Bipasha Basu Daughter Devi
Lal Salaam Teaser: दिवाळीला रजनीकांत यांनी फोडला बॉम्ब! धडाकेबाज अ‍ॅक्शन अवतारात देणार माणुसकीचा धडा!

सध्या बिपाशाची ही पोस्ट सोशल मिडियावर व्हायरल झाली आहे. नेटकरी यावर प्रतिक्रिया देत आहे. त्याचबरोबर बिपाशाचं कौतुकही करत आहे. देवीवर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com