#HappyBirthdayPriyanka : मिस वर्ल्ड प्रियांकाचा बर्थडे ट्विटरवर ट्रेंड!

टीम ईसकाळ
गुरुवार, 18 जुलै 2019

मिस वर्ल्ड प्रियांका चोप्राचा आज वाढदिवस! बॉलिवूडमधील बोल्ड, ब्युटीफुल आणि अभिनयाच्या गुणाने संपन्न असणारी अभिनेत्री म्हणून प्रियांकाचा ओळख आहे.

मिस वर्ल्ड प्रियांका चोप्राचा आज वाढदिवस! बॉलिवूडमधील बोल्ड, ब्युटीफुल आणि अभिनयाच्या गुणाने संपन्न असणारी अभिनेत्री म्हणून प्रियांकाचा ओळख आहे. तसेच स्वतःच्या हिमतीवर आतापर्यंतची कारकिर्द तिने घडवली आहे. मागील वर्षी अमेरिकन गायक निक जोनाससोबत तिचा विवाह संपन्न झाला. 

बॉलिवूडमधील या यशस्वी अभिनेत्रीवर सोशल मीडियामधून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. तिने अनेक उत्कृष्ट चित्रपट बॉलिवूडला दिले. बाजीराव मस्तानी, बर्फी, द हिरो, दिल धडकने दो, अंजाना अंजानी असे अनेक चित्रपट तिने चित्रपटसृष्टीला दिले.   

 

 

 

 

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Birthday of Actress Priyanka Chopra Today