Ram Charan Birthday: लग्नाचं निमित्त ठरलं समोसे आणि चटणी.. RRR सारखीच फिल्मी आहे राम चरणची लव्हस्टोरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 ram charan, ram charan news, ram charan birthday, ram charan love story, RRR

Ram Charan Birthday: लग्नाचं निमित्त ठरलं समोसे आणि चटणी.. RRR सारखीच फिल्मी आहे राम चरणची लव्हस्टोरी

Ram Charan Love Story: RRR सिनेमाने ऑस्करवर नाव कोरून जागतिक स्तरावर भारताचं नाव उंचावलं. RRR सिनेमात अल्लुरी सीतारामाची भूमिका साकारली अभिनेता राम चरणने. राम चरणचा आज वाढदिवस.

राम चरणच्या वाढदिवसाला सगळे टॉलिवूड फॅन्स एकवटले आहेत. आणि लाडक्या सुपरस्टारचा वाढदिवस जल्लोषात साजरा करत आहेत.

आज राम चरणच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊया त्याची आणि बायको उपासना यांची फिल्मी लव्हस्टोरी.

(birthday boy Ram Charan and upasna love story is similar to RRR )

राम आणि उपासना कॉलेजच्या दिवसांपासून एकमेकांना ओळखतात. कॉलेजच्या दिवसांमध्ये दोघांमध्ये चांगल्या गप्पा व्हायच्या. पण दोघांमध्ये प्रेम असं काही नव्हतं. सध्या एकमेकांचे नवरा बायको असलेले राम आणि उपासना कॉलेजच्या काळात मात्र एकमेकांशी खूप भांडत असत. आणि भांडणाचे कारण काय तर समोसे आणि चटणी..

कॉलेजमध्ये असताना दोघे एकमेकांशी खुप भांडायचे. इतकंच नव्हे तर वाद टोकाला गेला कि एकमेकांवर समोसे आणि चटणी फेकून मारायचे. पण या भांडणाचे प्रेमात रूपांतर कसे झाले हे दोघांनाही कळले नाही.

मग पुढे राम चरणने सिनेमात अभिनय करण्याचा निर्णय घेतला. तो मागाधीरा सिनेमाच्या शूटिंगसाठी निघून गेला. शूटिंगमध्ये व्यस्त असल्याने दोघांमध्ये असलेलं बोलणं थांबलं. आणि दोघांना एकमेकांची आठवण येऊ लागली.

मागाधिराच्या शूटिंगदरम्यान दोघेही एकमेकांना डेट करू लागले. अशाप्रकारे मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं आणि दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.

दोघांचे कुटुंबीय त्यांना आधीपासूनच ओळखत होते. त्यामुळे लग्न करण्याला दोघांच्याही घरच्यांनी आनंदाने संमती दिली.

पुढे मग ११ डिसेंबर २०११ ला दोघांनी साखरपुडा केला तर जून २०१२ ला दोघांनी लग्न केलं.

RRR सिनेमाला यंदा मानाचा ऑस्कर मिळाल्याने राम चरणच्या वाढदिवसाचं डबल सेलिब्रेशन असणार यात शंका नाही.

राम चरणच्या आजवरच्या करियरच्या चढउतारात त्याची प्रेयसी आणि बायको उपासनाने त्याला खंबीर साथ दिलीय.

टॅग्स :Birthdayrrr movie