esakal | सुशांत सिंहच्या कुटुंबातील मोठी बातमी; चुलत भावाला हृदयविकाराचा झटका
sakal

बोलून बातमी शोधा

sushant neeraj

भाजप आमदार नीरज बबलू यांना बुधवारी सायंकाळी हार्ट अटॅक आला होता. ज्यानंतर तातडीने त्यांना रुग्णालयात हलवण्यात आलं.

सुशांत सिंहच्या कुटुंबातील मोठी बातमी; चुलत भावाला हृदयविकाराचा झटका

sakal_logo
By
दिपाली राणे-म्हात्रे, टीम ई सकाळ

मुंबई- दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या चुलत भावाला रुग्णालयात हलवण्यात आल्याची माहिती समोर येतेय. सुशांत सिंह राजपूतचा चुलत भाऊ आणि बिहारमधील सुपौल जिल्ह्यातील छातापुरचे भाजप आमदार नीरज कुमार सिंह बबलू यांना ह्रदयविकाराचा झटका आला आहे. त्यांना जवळच्या एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. भाजप आमदार नीरज बबलू यांना बुधवारी सायंकाळी हार्ट अटॅक आला होता. ज्यानंतर तातडीने त्यांना रुग्णालयात हलवण्यात आलं. कुटुंबीयांनी सांगितलं की सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे.

हे ही वाचा: रणवीर सिंहच्या मर्सिडीज कारला बाईकस्वाराने दिली धडक, रणवीरने गाडीतून उतरुन अशी दिली रिऍक्शन

भाजप आमदार नीरज कुमार सिंह बबलू यांनी सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात सीबीआयची चौकशीची मागणी केली होती. त्यांनी अनेकदा मुख्यमंत्री नितीश कुमार यांना वैयक्तिक रुपात सीबीआय तपास करण्याची मागणी केली होती. ते सुशांतच्या अंत्यसंस्कारामध्ये सहभागी होण्यासाठी मुंबईलाही आले होते.

बुधवारी बिहारमध्ये आमदारकीच्या निवडणुकांसाठी भाजपने ३५ उमेदवारांची सूची जारी केली आहे. या लिस्टमध्ये सुशांत सिंह राजपूत यांचे भाऊ नीरज सिंह यांना तिकीट देण्यात आलं आहे. नीरज सिंह यांना छातापुर विधानसभासाठी भाजपने उमेदवारी दिली आहे. नीरज सिंह या सीटवरुन तीन वेळा आमदारकीची निवडणूक जिंकले आहेत. राज्यात तीन टप्प्यात निवडणुका होतील. पहिल्या टप्प्यात ७१ जागांवर २८ ऑॅक्टोबर रोजी दुसर्‍या टप्प्यांतर्गत ९४ जागांवर ३ नोव्हेंबर आणि तिसर्‍या टप्प्यासाठी ७८ जागांसाठी ७ नोव्हेंबर रोजी मतदान होईल. मत मोजणी १० नोव्हेंबर रोजी होईल व निकाल समोर येईल.

सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यूला ५ महिन्यांचा कालावधी उलटून गेला आहे. १४ जून रोजी सुशांत आपल्या वांद्रे येथील घरी मृत अवस्थेत सापडला. या प्रकरणात एक महत्वपूर्ण माहिती समोर आली आहे. सेंट्रल ब्यूरो ऑॅफ इन्वेस्टिगेशन (सीबीआय) लवकरच संपूर्ण प्रकरणाचा तपास संपवून क्लोजर रिपोर्ट जारी करण्याची शक्यता आहे.  

bjp mla niraj kumar singh bablu admitted in hospital patna