#BobBiswas शाहरूख-अभिषेक पुन्हा एकत्र झळकणार!

टीम ईसकाळ
सोमवार, 25 नोव्हेंबर 2019

अभिषेकचा 'बॉब बिस्वास' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाच्या निमित्ताने अभिषेक आणि शाहरूख खान एकत्र येणार आहेत.

मागील अनेक दिवस चित्रपटसृष्टीपासून लांब असलेला अभिषेक बच्चन आता दमदार कमबॅक करणार आहे. अभिषेकचा 'बॉब बिस्वास' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाच्या निमित्ताने अभिषेक आणि शाहरूख खान एकत्र येणार आहेत. अभिषेक बच्चन 'बॉब बिस्वास'मध्ये मुख्य भूमिकेत दिसेल. आजच या चित्रपटाची घोषणा करण्यात आली. 

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

अभिषेक आणि शाहरूख हे पडद्यावर एकत्र नसले तरी शाहरूखची रेड चिलीज एन्टरटेन्मेंट ही कंपनी या चित्रपटाची निर्मिती करत आहे. बॉब बिस्वास म्हणलं की कहानी मधला सायको किलर आठवतो. याच पात्रावर आधारित बॉब बिस्वास हा चित्रपट दिया घोष दिग्दर्शित करणार आहे. रेड चिलीजने केलेल्या ट्विटमध्येही 'नमोश्कार' असे बंगालीत लिहिलं आहे. त्यामुळे हे कहानी मधलंच पात्र असून आता ते मोठ्या पडद्यावर स्वतंत्रपणे बघायला मिळणार आहे. 

'काळी-निळी लिपस्टीक तर कॉमन आहे' बघा काय म्हणतेय सारा !

रेड चिलीज आणि शाहरूख खान दोघांनी ट्विटरवरून चित्रपटाची घोषणा केली आहे. अभिषेक बच्चनसह थ्रिलींग चित्रपट करण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत, असं ट्विट शाहरूखने केलंय.

क्रॉप टॉप घालून मंदिरात गेली अजयची लेक, इंटरनेटवर झाली ट्रोल !

तसेच अभिषेकही खूप दिवसानंतर शाहरूखसोबत काम करण्यास उत्सुक असल्याचे त्याने सांगितले. या चित्रपटाचे शूटींग 2020मध्ये सुरू होईल. प्रदर्शनाची तारीख अद्यापही जाहीर केलेली नाही. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bob Biswas movie announced by Abhishek Bachchan and Shahrukh Khan