बाबा निराला येतोय.. "आश्रम"चा तिसरा भाग लवकरच.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

'ashram 3' coming soon

बाबा निराला येतोय.. 'आश्रम'चा तिसरा भाग लवकरच..

समाजातील अनिष्ठ रुढी परंपरा यांना शस्त्र बनवून त्याचा वापर करणा-या भोंदू बाबांचा बुरखा फाडण्याचे काम करणारांनी आश्रम (ashram) ही वेब सिरीज सर्वांना परिचित आहे. या वेब सिरीजचे याआधी दोन सिझन झाले असून आता तिसरा सिझन येऊ घातला आहे. आधीचे दोनही सिझन तुफान लोकप्रिय झाले. या वेबसिरीला विरोधही झाला परंतु त्याला न जुमानता या वेबसिरीजने अनेक विक्रम केले.आता येणाऱ्या 'आश्रम ३' या (ashram 3) तिसऱ्या भागाचा मोशन व्हिडीओ नुकताच प्रकाशित झाला आहे.

हेही वाचा: Bookmyshow: 'बुक माय शो'ला मनसे देणार दणका.. अमेय खोपकरांच्या अल्टिमेटम

पहिल्या दोन्ही आणि आता येणाऱ्या तिसऱ्या भागात 'बॉबी देवल' (bobby deol) प्रमुख भूमिकेत असून 'बाबा निराला' असे त्याच्या पात्राचे नाव आहे, त्याचे हे पात्र बरेच लोकप्रिय झाले होते. त्यामुळे या वेब सिरीजच्या तिसऱ्या पर्वाची लोकांनाही उत्सुकता होती. ही प्रतीक्षा आता संपली आहे. ‘आश्रम ३’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. बॉबीने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरन एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये फक्त तीन हा आकडा दिसत आहे. ‘आश्रम’ मधील बॉबीची सहकलाकार ईशा गुप्तानेही (isha gupta) हाच व्हिडीओ शेअर केला आहे.

‘आश्रम ३’ कधी प्रदर्शित होणार हे अद्यापही स्पष्ट झाले नसले तरी चित्रीकरण आणि डबिंगचं काम पूर्ण झाल्याची माहिती समोर आली आहे. प्रकाश झा दिग्दर्शित या वेबसीरिजने बॉबीच्या करिअरला एक नवी दिशा मिळाली. बॉबी चित्रपट क्षेत्रापासून बरीच वर्षे दूर होता. पण आश्रम या वेब सिरीज मधून त्याने स्वतःचा अभिनय सिद्ध केला. सध्या त्याच्याकडे अनेक ऑफर येत असून ‘एनिमल’ हा त्याचा हिंदी चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे.

Web Title: Bobby Deol Ashram 3 Web Series Coming Soon Actors Shares Motion Video

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top