esakal | अपघातानं पंकज बेरीचं करिअरच उद्ध्वस्त झालं
sakal

बोलून बातमी शोधा

pankaj berry

अपघातानं पंकज बेरीचं करिअरच उद्ध्वस्त झालं

sakal_logo
By
युगंधर ताजणे

मुंबई - आपल्या भूमिकेमुळं जाणकार प्रेक्षक, समीक्षकांच्या लक्षात राहिलेले अभिनेते म्हणून अभिनेते पंकज बेरी (pankaj berry) यांच्या नावाचा उल्लेख करता येईल. त्यांनी अनेक टीव्ही सिरिअल्स आणि चित्रपटांमध्येही काम केले आहे. मात्र सध्या ते पडद्यापासून दूर आहेत. याचे कारण म्हणजे त्यांना झालेला अपघात. यामुळे गेल्या कित्येक काळ त्यांनी अभिनयाशिवाय व्यतीत केला आहे. पंकज यांचा मनोरंजन क्षेत्रातील (entertainment) प्रवास मोठा आहे. त्यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत आपल्या प्रवासाविषयी सांगितले. त्यातून बेरी यांचा प्रवास किती संघर्षमय (struggeling) आहे हे दिसून आले आहे.(bollwood actor pankaj berry his ups and downs in his career reveals losing many films due to major accident 1992 yst88)

पंकज बेरी (pankaj berry) यांनी टाईम्स नाऊवर मुलाखत दिली आहे. त्यात त्यांनी आपल्या मनोरंजन क्षेत्रातील वेगवेगळ्या प्रवासाविषयी सांगितले. यावेळी त्यांनी काही खुलासे केले आहेत. त्यांनी सांगितले, माझा अपघात जेव्हा सांगितला तेव्हा त्यात मला मोठ्या प्रमाणात इजा झाली. त्याचा परिणाम माझ्या कार्यक्षमतेवर झाला. मला चित्रिकरणाला जाणं अवघड होऊन बसलं. यामुळे मला माझ्या आवडीच्या क्षेत्रापासून लांब जावं लागलं. त्याला कारणही तसंच होत.

अनेकांना माहिती नव्हतं की, मी का मनोरंजन क्षेत्रापासून लांब पळतो आहे ते, अपघातानं सर्व काही हिरावून नेलं होतं. अशावेळी मी काय करणार होतो, असा प्रश्न पंकज यांनी उपस्थित केला आहे. आपल्या आयुष्यात अनेक प्रकारचे चढ उतार पाहिलेल्या पंकज यांनी कारकीर्दीची सुरुवात मजेदार असल्याचे सांगितले. आव्हानं आणि संकटं कुणासमोर येत नाहीत, ते आहेत म्हणून प्रवास अधिक अर्थपूर्ण होतो असे मला वाटते. वेगवेगळ्या प्रकारच्या आव्हांनांचा सामना करणं मला आवडतं. असेही त्यांनी यावेळी सांगितले.

हेही वाचा: Mimi trailer: 'सरोगेट मदर'ची अनपेक्षित कहाणी

1992 मध्ये मी सैनिक नावाच्या एका चित्रपटापासून माझा प्रवास सुरु झाला होता. त्यावेळी माझा अपघात झाला. तेव्हा माझे एकापेक्षा अधिक चित्रपटांचे शुटिंग सुरु होते. माझे मोठे नुकसान झाले. माझ्या हातातून एकाहून एक सरस असे चित्रपट निघून गेले होते. मात्र आता त्याबद्दल बोलून काही उपयोग नाही. मी माझ्या प्रवासाचा आनंद घेतो आहे. या शब्दांत पंकज यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

loading image