esakal | Mimi trailer: 'सरोगेट मदर'ची अनपेक्षित कहाणी
sakal

बोलून बातमी शोधा

mimi trailer

Mimi trailer: 'सरोगेट मदर'ची अनपेक्षित कहाणी

sakal_logo
By
प्रियांका कुलकर्णी

'सरोगेट मदर' या विषयावरील अनेक लघुपट किंवा चित्रपट तुम्ही पाहिले असतील. पण 'मिमी' या आगामी बॉलिवूड चित्रपटात सरोगेट मदर ही संकल्पना नव्याने प्रेक्षकांसमोर मांडण्यात येणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शत झाला असून चित्रपटामध्ये क्रिती सनॉन (kriti sanon), पंकज त्रिपाठी (pankaj tripathi) आणि मराठमोळी अभिनेत्री सई ताम्हणकर (sai tamhankar) प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. (mimi trailer release kriti sanon surrogacy journey pvk99)

ट्रेलरने वाढवली चित्रपटाच्या कथेविषयीची उत्सुकता

ट्रेलरमध्ये असे दिसत आहे की, पंकज त्रिपाठी हे क्रितीला एका अमेरिकन कपलच्या मुलाला सरोगसीच्या माध्यमातून जन्म देण्यासाठी तयार करतात. ते अमेरिकन कपल क्रितीला सरोगसीसाठी 20 लाख रूपये देण्यासाठी तयार देखील होतात. क्रिती त्यांच्या मुलाला जन्म देण्यासाठी तयार होते. मात्र सरोगसीच्या या प्रवासात क्रितीला अनेक संकटांना सामोरे जावे लागते. या संकटांवर मात करत ती कशी त्या बाळाला जन्म देते, हे या चित्रपटामध्ये दाखवण्यात येणार आहे. या ट्रेलरमुळे या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.

हेही वाचा: अंतर्वस्त्रांवरून ट्रोल करणाऱ्यांना हेमांगी कवीचं सडेतोड उत्तर

क्रितीची हटके पोस्ट

चित्रपटाचा ट्रेलर शेअर करून क्रितीने त्याला कॅप्शन दिले, 'मिमीचा अनपेक्षित प्रवास या चित्रपटामधून मांडला आहे. मिमीचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. तिचा या प्रवासाचे काही क्षण तुमच्या कुटुंबासोबत पहा.'

मिमी हा चित्रपट राष्ट्रीय पुरस्कार विजेता मराठी चित्रपट 'मला आई व्हायचंय' या चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. या चित्रपटामध्ये सरोगेट मदरची भूमिका करण्यासाठी क्रितीने 15 किलो वजन वाढवले आहे.

loading image