बघा अक्षय कुमार काय म्हणतोय...'मी धर्मासाठी जगलोय अन्'... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बघा अक्षय कुमार काय म्हणतोय...'मी धर्मासाठी जगलोय अन्'...
बघा अक्षय कुमार काय म्हणतोय...'मी धर्मासाठी जगलोय अन्'...

बघा अक्षय कुमार काय म्हणतोय...'मी धर्मासाठी जगलोय अन्'...

sakal_logo
By
टीम इ सकाळ

मुंबई - कोरोनाची पहिली लाट ओसरल्यानंतर आता काही प्रमाणात का होईना मनोरंजन क्षेत्राला मोठा दिलासा मिळाला आहे. अनेक मोठमोठ्या बॅनरचे चित्रपट प्रदर्शनाच्या उंबरठ्यावर आहेत. काही प्रदर्शित झाले आहे. दोन आठवड्यांपूर्वी प्रदर्शित झालेल्या सूर्यवंशी चित्रपटाला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. या चित्रपटानं साऊथच्या सुपरस्टार रजनीकांतच्या अन्नाथेला आव्हान दिले आहे. शंभर कोटीचं टार्गेट या चित्रपटानं केव्हाच पूर्ण केलं आहे. आता अक्षयच्या पृथ्वीराजची चर्चा सुरु झाली आहे.

अक्षयच्या पृथ्वीराजची चर्चा जोरदारपणे सोशल मीडियावर सुरु झाली आहे. त्यामध्ये त्याच्या संवादाला जबरदस्त प्रतिसाद मिळाला आहे. त्यामध्ये त्यानं म्हटलं आहे की, धर्मासाठी जन्माला आलो आहे आणि धर्मासाठीच मरणार आहे. त्याच्या या संवादाची सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे. त्याला चाहत्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या कमेंटही दिल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून अक्षयच्या अनेक चित्रपटांची चर्चा रंगताना दिसत आहे. काही महिन्यांपूर्वी त्याचा बेल बॉटम नावाचा चित्रपट येवून गेला होता. मात्र त्याला प्रेक्षकांचा फारसा प्रतिसाद मिळाला नाही.

हेही वाचा: 'कंगना जे म्हणाली ते खरंय, मी समर्थन करतो'; विक्रम गोखले

हेही वाचा: विक्रम गोखलेंच्या वक्तव्यावर शरद पवार यांची प्रतिक्रिया, म्हणाले...

आज यशराज फिल्म्सच्यावतीनं पृथ्वीराजचा टीझर प्रदर्शित झाला आहे. त्याला अपेक्षेनुसार चाहत्यांचा प्रतिसाद मिळाला आहे. या चित्रपटामध्ये अक्षय हा पृथ्वीराज चौहान यांच्या भूमिकेत दिसणार आहे. सध्या व्हायरल झालेल्या टीझरमध्ये दाखवण्यात आले आहे की, रणांगणामध्ये अक्षय हा सैनिकांसमवेत उभा आहे. त्याच्या समवेत संजय दत्तही आहे. या चित्रपटातून विश्वसुंदरी मानुषी छिल्लर ही बॉलीवूडमध्ये इंट्री करणार आहे. मी धर्मासाठीच जन्माला आलो आहे आणि धर्मासाठीच मरणार या अक्षयच्या संवादाला चाहत्यांनी प्रतिसाद दिला आहे. हा चित्रपट 21 जानेवारीला प्रदर्शित होणार आहे.

loading image
go to top