'कही ये वो तो नही' प्रसिद्ध अभिनेते अनुपम खेर यांचा Video Viral

बॉलीवूडमध्ये (Bollywood) आपल्या हटके अभिनयानं अनुपम खेर (Anupam Kher) हे नेहमीच चाहत्यांचे लक्ष वेधून घेतलं आहे.
Anupam Kher share omicron video social media
Anupam Kher share omicron video social media

बॉलीवूडमध्ये (Bollywood) आपल्या हटके अभिनयानं अनुपम खेर (Anupam Kher) हे नेहमीच चाहत्यांचे लक्ष वेधून घेतलं आहे. गेल्या चार दशकांहून अधिक काळ अनुपम खेर हे बॉलीवूडमध्ये (Bollywood Actor Anupam Kher) कार्यरत असलेले अभिनेते आहेत. त्यांच्या अभिनयाचे लाखो फॅन्स आहेत. सोशल मीडियावरही खेर हे नेहमीच कार्यरत असतात. वेगवेगळ्या प्रकारचे फोटो आणि व्हिडिओ ते शेयर करुन चाहत्यांचे लक्ष वेधून घेत असतात. सध्या त्यांचा एक व्हिडिओ तुफान व्हायरल झाला आहे. त्यामध्ये त्यांनी ओमीक्रॉनविषयी गंमतीशीर व्हिडिओ शेयर केला आहे. (Anupam Kher share omicron video social media)

सध्या सर्वत्र ओमीक्रॉन या कोरोनाच्या नव्या व्हेरीयंटची चर्चा आहे. देशभरासह राज्यात ओमायक्राॅनशिवाय दुसरा विषय नाही. ओमायक्राॅन इतका घातक नसला आणि त्यामुळे मृत्यू होत नसला तरी त्याच्या संसर्गाची क्षमता तिप्पट आहे. त्यामुळेच ओमीक्रॉन बाधितांची संख्या सध्या झपाट्याने वाढत आहे. अभिनेते अनुपम खेर यांनी नेमके यावरच बोट ठेवणारा एक तिरकस व्हिडीओ व्टिटरचा भारतीय अवतार असलेल्या "कू' या अॅपवर प्रसारित केला आहे. प्रसारित होताच अक्षरश: लाखो लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आणि तेवढ्याच वेगाने तो व्हायरलही करीत आहेत. ओमीक्रॉननं फुफ्फुसावर आक्रमण करीत नाही. तर घशाला बाधित करतो. अनुपम खेर यांनी आपल्या व्हिडीओतून ही बाब तिरकसपणे सांगितली आहे. यासाठी त्यांनी "कही ये वो तो नही' या गाण्याची पॅरोडी केली आहे.

Anupam Kher share omicron video social media
Viral Video : हे काय नवं खुळं! महिलेने चक्क केसांमध्ये गुंडाळला साप

जरासी खरखराहट होती है, तो दिल सोचता है, कही ये वो तो नही, कही ये वो तो नही ....असं गाणं गुणगुणत त्यांनी ओमीक्रॉनबाबत एक व्हिडिओ शेयर केला आहे. या ओळीतून साधे खाकरले तरी घाबरल्यासारखे होते अशी मजेदार भावना व्यक्त केली आहे. "कू' वरील हा व्हिडीओ झपाट्याने व्हायरल झाला. आज प्रत्येकाच्या तोंडी हाच व्हिडीओ आहे. या शिवाय दोन डोस घेतल्यानंतरही कोरोना बाधित होणाऱ्यांची संख्या वाढत आहे. हे पाहाता दोन डोस घेतल्यानंतरही निष्काळजीपणा न करता मास्क घाला आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन करा असे आवाहन "कू' अॅपवर केले आहे.

Anupam Kher share omicron video social media
VIDEO : नंबर वन बॉलरला मार्क वूडचा कडक सिक्सर, गिलस्पीही फिदा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com