अभिनेते अनुपम खेर यांचा मुलगा बेरोजगार? सोशल मीडियावर मागतोय काम

दिपाली राणे-म्हात्रे
Saturday, 21 November 2020

सिकंदर हा सेलिब्रिटी किड असून देखील कामाचा शोध घेतोय. त्याच्याकडे सध्या बिलकूल काम नाहीये. त्यामुळे त्याने सोशल मिडियावर काम मागायला सुरुवात केलीये. 

मुंबई- बॉलिवूड सिनेसृष्टीवर अनेकदा घराणेशाहीचा आरोप केला जातो. ही इंडस्ट्री स्टार किड्सला प्राध्यान्य देते असं म्हटलं जातं. घराणेशाहीच्या वातावरणात काही कलाकार असेही आहेत ज्यांच्याकडे बिलकूल काम नाहीये. असंच काहीसं घडतंय ते प्रसिद्ध अभिनेते अनुपम खेर यांचा मुलगा सिकंदर खेरच्या बाबतीत. सिकंदर हा सेलिब्रिटी किड असून देखील कामाचा शोध घेतोय. त्याच्याकडे सध्या बिलकूल काम नाहीये. त्यामुळे त्याने सोशल मिडियावर काम मागायला सुरुवात केलीये. 

हे ही वाचा: 'बिग बॉस'च्या घरात होणार एकता कपूरची एंट्री    

अनुपम खेर यांच्या मुलाने सोशल मिडियावर “काही काम असेल तर मला सांगा” अशी विनंती नेटकऱ्यांना केली आहे. सिकंदरने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये त्याचा चेहरा थोडा त्रासदायक दिसत आहे. या फोटोच्या माध्यमातून तो काम मागत आहे. “कोणाकडे काही काम असेल तर सांगा, मला कामाची गरज आहे. मी हसू देखील शकतो.” अशा आशयाची कमेंट त्याने या फोटोवर केलीये. त्याची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर सगळ्यांच लक्ष वेधून घेत आहे. 

अभिनेते अनुपम खेर एक अष्टपैलू अभिनेते आहेत. ते बॉलिवूडमधील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या कलाकारांपैकी एक म्हणून ओळखले जातात. या पार्श्वभूमीवर त्यांच्या मुलाकडे काम नाही हे पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.यावर आता अनुपम खेर कसे रिऍक्ट होतात हे पाहायचंय.   

sikander kher needs work anupam kher son asking for work in his new instagram post  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sikander kher needs work anupam kher son asking for work in his new instagram post