esakal | अरमान कोहली अडचणीत, न्यायालयीन कोठडीत रवानगी
sakal

बोलून बातमी शोधा

arman kohli

अरमान कोहली अडचणीत, न्यायालयीन कोठडीत रवानगी

sakal_logo
By
युगंधर ताजणे

मुंबई - बॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता अरमान कोहलीच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. त्याला एनसीबीनं ड्रग बाळगल्याप्रकरणी अटक केली होती. मात्र आता त्याची डोकेदुखी आणखी वाढल्याचे दिसून आले आहे. कोर्टानं त्याला चौदा दिवस न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे. त्यामुळे येत्या दिवसांत अरमान कोहलीच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जातेय. काही दिवसांपूर्वी अंमली पदार्थ विरोधी पथकाला त्याच्या घरी काही अंमली पदार्थ आढळून आले. त्यानंतर त्यांनी त्याला चौकशीसाठी बोलावले. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार त्याच्या घरातून कोकेन जप्त करण्यात आले होते. ते कोकेन दक्षिण अमेरिकेतून आणल्याची माहिती एनसीबीच्या हाती लागली आहे. आता एनसीबी हे ड्रग मुंबईत कसे आले याचा शोध घेत आहे.

एनसीबीच्या टीमनं शनिवारी अरमान कोहलीच्या घरी छापा टाकला होता. त्यानंतर त्याची चौकशीही करण्यात आली. आणि त्याला ताब्यात घेण्यात आले. यानंतर बॉलीवूडमध्ये खळबळ उडाली आहे. एनसीबीच्या अशा धडक कारवाईमुळे बॉलीवूडमध्ये चिंतेचे वातावरण आहे. बॉलीवू़डचा दिवंगत अभिनेता सुशांतसिंग राजपूतच्या आत्महत्येनंतर बॉलीवूडमधील ड्रग्ज प्रकरण समोर आले होते. त्यावेळी अनेक मोठमोठ्या सेलिब्रेटींची नावं उजेडात आली होती. अखेर कित्येक सेलिब्रेटींनी प्रेक्षकांना आवाहन करुन आपली बदनामी न करण्यास सांगितले होते. त्यासंबंधी काही पोस्टही व्हायरल केल्या होत्या.

एनसीबीनं जेव्हा अरमानला चौकशीसाठी कार्यालयात बोलावून घेतले तेव्हा त्याच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार एनसीबीनं त्याच्यावर गुन्हा दाखल केला. अरमानसहित अजूनही अनेक कलाकार एनसीबीच्या रडारवर आहेत. येत्या काळात त्यांची चौकशी होणार असल्याचेही सुत्रांकडून सांगितले जात आहे. यापूर्वी बॉलीवूडच्या काही ए ग्रेड सेलिब्रेटींचीही चौकशी झाली आहे. त्यात अभिनेत्री दीपिका पादुकोण, सारा अली खान, श्रद्धा कपूर, रिया चक्रवर्ती यांचा समावेश आहे. एनसीबीनं अभिनेता गौरव दीक्षितलाही याप्रकरणात अटक केली आहे.

हेही वाचा: अरमान कोहली प्रकरणात NCB ची पाच ठिकाणी छापेमारी

हेही वाचा: छापेमारीनंतर अभिनेता अरमान कोहली एनसीबीच्या ताब्यात

२०१३ मध्ये अरमान कोहली हा बिग बॉसमध्ये दिसला होता. त्यानं १९९२ मध्ये आपल्या बॉलीवूडच्या प्रवासाला सुरुवात केली होती. त्यानंतर त्यानं छोट्या पडद्यावर काम केलं. विरुद्ध पासून त्यानं आपल्या करिअला सुरुवात केली. मात्र बॉलीवूडमध्ये तो काही मोठं यश मिळवू शकला नाही. त्याच्यावर आता झालेले आरोप आणि न्यायालयानं सुनावलेली १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी यामुळे त्याच्या अडचणीत वाढ झाल्याची चर्चा आहे.

loading image
go to top