अमिताभ बच्चन यांना 'गॉडफादर' का म्हणू?, अर्शद वारसीची खंत|Bollywood Actor Arshad Warshi Bachchan Pandey | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

arshad warsi

अमिताभ बच्चन यांना 'गॉडफादर' का म्हणू?, अर्शद वारसीची खंत

Bachchan Pandey: बॉलीवूडमध्ये असे काही अभिनेते आहेत जे फक्त (Bollywood Movies) त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण अभिनयामुळे ओळखले जातात. त्यामध्ये अभिनेता अर्शद वारसी (Arshad Warsi) यांच्या नावाचा उल्लेख करावा (Entertainment News) लागेल. या अभिनेत्यानं 1996 मध्ये तेरे मेरे सपने नावाच्या मुव्हीपासून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं होतं. त्यानंतर वेगवेगळ्या विषयांवरील चित्रपटांमधून अर्शद वारसीनं चाहत्यांची मनं जिंकली आहेत. आता अर्शद वारसी बच्चन पांडे (Akshay Kumar bachchan pandey movie) या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्याची चर्चा सुरु झाली आहे. बच्चन पांडेच्या ट्रेलरला नेटकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. अक्षय कुमारची प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटामध्ये क्रिती सेनन मुख्य अभिनेत्री आहे.

आता अर्शद चर्चेत आला आहे तो बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्या कंपनीवर एक गंभीर आरोप केल्याप्रकरणी. त्यानं बच्चन यांच्या कंपनीबाबत वेगळा अनुभव शेयर केला आहे. त्यामुळे त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. तेरे मेरे सपने या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या अर्शद वारसीच्या चित्रपटाची निर्मिती बच्चन यांच्या कंपनीनं केली होती. आता त्यानं त्यावर भाष्य केलं आहे. अर्शदनं एका मुलाखतीतून त्याविषयी सांगितलं आहे की, त्या चित्रपटानंतर मला बच्चन यांच्या कंपनीकडून कोणत्याही प्रकारची विचारणा करण्यात आली नाही. त्यांचे सहकार्य कधीच मिळाले नाही. सध्या अर्शद हा बच्चन पांडे या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.

हेही वाचा: Photo Viral: दिया मिर्झा पहिल्यांदाच दिसली छोट्या 'अव्यान' सोबत

बच्चन यांनी मला त्यांच्या त्या चित्रपटातून बॉलीवूडच्या मुख्य प्रवाहात तर आणलं मात्र त्यानंतर मला सोडून दिलं. जॉय ऑगस्टिन यांनी त्या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. मला त्यांनी तसे का केले माहिती नाही. मग मी त्यांना गॉडफादर म्हणू की नको या प्रश्नात आहे. अशी खंत वारसीनं यावेळी व्यक्त केली आहे.

Web Title: Bollywood Actor Arshad Warshi Bachchan Pandey Amitabh Bachchan Company

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top