
Ayushmann Khurrana: ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’ साठी दिली ऑडिशन, तो रोल कुणाला मिळाला?
Tv Entertainement News: बॉलीवूडमध्ये अल्पावधीत स्वताची वेगळी ओळख निर्माण करणारा अभिनेता म्हणून आयुषमान खुराणा हा चाहत्यांच्या आवडीचा अभिनेता आहे. त्याच्या चित्रपटांना मिळणारा प्रेक्षकही मोठा आहे. सोशल (Social media viral news) मीडियावर नेहमीच आयुषमानला मोठी प्रसिद्धी मिळत असते. चाहत्यांशी सतत संवाद साधणे, त्यांच्या प्रश्नांना उत्तरं देणं यात आयुषमान नेहमीच पुढे असतो. सध्या त्याचा अनेक नावाचा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस पडताना दिसतो आहे. आर्टिकल 15 नंतर तो पुन्हा एकदा वेगळ्या भूमिकेतून (Bollywood News) प्रेक्षकांच्या भेटीला आहे. यापूर्वीच्या त्याच्या वेगवेगळ्या भूमिकांना प्रेक्षकांनी पसंद केलं आहे. बॉलीवूडचा सध्याच्या घडीला प्रख्यात अभिनेता म्हणून त्याचे नाव घेता येईल.
फार कमी जणांना आयुषमान खुराणाविषयी एक गोष्ट माहिती असेल ती म्हणजे त्यानं टीव्ही मनोरंजन क्षेत्रातील लोकप्रिय मालिका क्योंकी की सास भी कभी बहु थी नावाच्या मालिकेसाठी ऑडिशन दिली होती. मात्र त्याचा रोल दुसऱ्याच एका (Ayushmann Khurrana) अभिनेत्याला मिळाला. विशेष बाब म्हणजे त्याचे त्या मालिकेसाठी सिलेक्शनही झाले होते. त्यानं कास्टिंग डायरेक्टरला चक्क नकार कळवला होता. आपल्याला बाहेर जायचे असल्याकारणानं आपण ती भूमिका (Bollywood Actor) कऱणार नाही. असं त्यानं सांगितलं होतं. गॉडफादरविना (entertainment News) बॉलीवूडमध्ये सक्सेस होणं ही मोठी गोष्ट आहे. आणि ती आयुषमाननं करुन दाखवली आहे. त्यामुळे त्याच्याकडे प्रेक्षकांचा पाहण्याचा दृष्टीकोन वेगळा आहे.
2012 मध्ये आलेल्या विकी डोनरसारख्या आगळ्या वेगळ्या विषयांवरील चित्रपटामध्ये आयुषमाननं डेब्यु केलं होतं. त्यातील त्याच्या भूमिकेला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसादही मिळाला होता. त्यात त्याच्या जोडीला यामी गौतम ही अभिनेत्री होती. विकी डोनरचा विषय प्रेक्षकांना भावला. त्याची मांडणी. संवाद, गाणी हे सारं काही उत्तम जमून आलं होतं. आयुषमान हा रोडीजमध्ये सेकंड सीजनचा विजेताही होता. त्या रियॅलिटी शोमुळे आयुषमानचा बॉलीवूडमधील प्रवास सोपा झाला आहे. दरम्यान एका टीव्ही शोसाठी त्यानं ऑडिशन दिलं होतं.
हेही वाचा: Varanasi Video Viral: गंगा आरती करताना कार्तिकच्या पायात चप्पल, चाहते नाराज
एका मुलाखतीमध्ये आयुषमाननं सांगितलं होतं की, बालाजीच्या क्योकी की सास भी कभी बहु थी या मालिकेसाठी मी ऑडिशन दिली होती. माझे सिलेक्शनही झाले होते. माझी भूमिका ही पुलकित सम्राटला मिळाली होती. त्यानं त्या भूमिकेचं सोनं केलं. त्या मालिकेमध्ये पुलकितनं लक्ष्य वीरानीची भूमिका साकारली होती.
Web Title: Bollywood Actor Ayushman Khurrana Audition Kyunki Saas Bhi Kabhi Bahu Thi Tv Serial
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..