Emran Hashmi : सलमानशी घेतलाय पंगा, जीममध्ये सुरुय कसरत! |Bollywood Actor Emraan Hashmi workout video | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

salman khan and emran hashmi news

Emran Hashmi : सलमानशी घेतलाय पंगा, जीममध्ये सुरुय कसरत!

Emraan Hashmi Video: बॉलीवूडमध्ये ज्या अभिनेत्यानं कमी वेळेत मोठी प्रसिद्धी मिळवली त्यामध्ये एका अभिनेत्याच्या नावाचा उल्लेख करावा लागेल. सध्या त्या अभिनेत्याची एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. इम्रान हाश्मीनं आता बॉलीवूडचा भाईजान सलमान खानशी पंगा घेतला आहे. सलमान खान (Bollywood News) सारखी बॉडी करण्याचा निर्धार केला आहे. सलमानशी टक्कर घेण्यासाठी तो कमालीची मेहनत करताना दिसतो आहे. त्याचा एक व्हिडिओ आता (Salman Khan news) सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्याला नेटकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले आहे.

गेल्या काही वर्षांपासून इम्रान हाश्मी हा चर्चेत आलेला अभिनेता आहे. त्याला वेबसीरिजमधून देखील चांगला प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले आहे. इम्रान (Bollywood movies) हाश्मी हा त्याच्या बोल्डनेससाठी ओळखला जाणारा अभिनेता आहे. बॉलीवूडमध्ये त्याला सीरियल किसर म्हणून ओळखले जाते. त्यानं आतापर्यत जेवढ्या चित्रपटांमध्ये काम केले आहे त्यामधील त्याच्या बोल्ड दृश्यांनी नेटकऱ्यांची पसंती मिळवली होती. आता इम्रान हाश्मीनं सलमानला टक्कर देण्यासाठी एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. त्याला मिळालेल्या प्रतिक्रिया मात्र कमालीच्या भन्नाट आहे.

हेही वाचा: Video : ठाकरे-शिंदे वादात रिक्षा-मर्सिडीजचा उल्लेख करत टोलवाटोलवी

केवळ नेटकरीच नाहीतर तर काही सेलिब्रेटींनी देखील इम्रान हाश्मीच्या त्या व्हिडिओवर कमेंट्स दिल्या आहेत. इम्रानच्या वर्कफ्रंटबाबत बोलायचे झाल्यास, तो आता लवकरच मनीष शर्माच्या टायगर 3 मध्ये दिसणार आहे. त्यात सलमान खान आणि कतरिना कैफसोबत दिसणार आहे. गेल्या काही दिवसांपासून या चित्रपटाची मोठ्या प्रमाणात चर्चा होती. त्याच्या टीझरला देखील नेटकऱ्यांनी पसंत केलं आहे. टायगर तीन नंतर तो धर्मा प्रॉडक्शनच्या सेल्फीमध्ये देखील दिसणार आहे.

हेही वाचा: Video: 'सलमानजी आप कब मामा बनोगे ?' राखीचा तो व्हिडिओ वायरल