फरहान- शिबानीचं ठरलं! एप्रिलमध्ये होणार विवाहबद्ध?

बॉलीवूडमध्ये फरहान अख्तर (Farhan Akhtar) आणि गायिका शिबानी दांडेकर (Shibani Dandekar) यांच्या नावाची गेल्या काही वर्षांपासून चर्चा आहे.
Farhan Akhtar-Shibani Dandekar
Farhan Akhtar-Shibani Dandekaresakal
Updated on

Bollywood News: बॉलीवूडमध्ये फरहान अख्तर (Farhan Akhtar) आणि गायिका शिबानी दांडेकर (Shibani Dandekar) यांच्या नावाची गेल्या काही वर्षांपासून चर्चा आहे. ते एकमेकांना डेट करत आहे. आता सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, फरहान अख्तर आणि शिबानी हे लग्नाच्या बंधनात अडकणार आहे. काही दिवसांपूर्वी फरहान आणि शिबानी हे सोशल मीडियावर (Social media news) नेहमी चर्चेचा विषय असतात. आता चाहत्यांना त्यांच्या ग्रँड वेडिंगचे (Grand wedding) वेध लागले आहेत. येत्या एप्रिल महिन्यात ते विवाहबंधनात अडकणार असल्याचे सांगण्यात आले आहे. अद्याप फरहानकडून ऑफिशियली कुठल्याही प्रकारची तारीख जाहीर करण्यात आलेली नाही.

दुसरीकडे असंही म्हटलं जात आहे की, हे जोडपं फेब्रुवारीमध्ये कोर्ट मॅरेज (Court Marraige) करणार आहे. आणि एप्रिलमध्ये ग्रँड सेलिब्रेशन करणार आहे. बॉलीवूड स्टाईलमध्ये वेडिंग करण्याचे प्लँनिंग असल्याचे सांगण्यात येत आहे. गेल्या वर्षी देखील या दोघांच्या लग्नाचे प्लँनिंग होते. मात्र कोरोनामुळे त्यांच्या लग्नाची तारीख ही पुढे ढकलण्यात आली होती. दोन्ही सेलिब्रेटी चर्चेतील असल्यानं त्यांच्या लग्नाला बॉलीवूडमधून मोठ्या प्रमाणावर दिग्गज उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या उपस्थितीसाठी एप्रिलमध्ये लग्नाचे प्लँनिंग करण्य़ात आले आहे. बॉलिवूडमधील (Bollywood) प्रेम प्रकरणांमध्ये गेल्या काही महिन्यांपासून फरहान आणि शिबानी ही जोडी देखील चर्चेचा विषय ठरली होती. फरहान अख्तर दोन वर्षांपूर्वी पत्नी अधुनापासून विभक्त झाला होता. मात्र, फरहाननं यावर सार्वजनिक आयुष्यात भाष्य करणं नेहमी टाळलं आहे.

Farhan Akhtar-Shibani Dandekar
Video: पेगॅसस प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात याचिका

यापूर्वी फरहान आणि शिबानी या वर्षी मार्च महिन्यात लग्न करणार असल्याची चर्चा होती. फरहान आणि शिबानीच्या लग्नाची माहिती इंडस्ट्रीतील एका सूत्रानं बॉलिवूड लाईफला दिलीय. सूत्रानं सांगितलं होतं, की फरहान आणि शिबानी मार्च महिन्यात मुंबईत भव्य लग्न करण्याचा विचार करत आहेत. पण, कोरोनाचा वाढता धोका आणि बॉलीवूडमधील अनेक सेलिब्रिटींना कोरोनाचा फटका बसत असल्यानं त्यांनी आपलं वैवाहिक जीवन लवकर सुरु करण्याचा निर्णय घेतलाय. फरहान आणि शिबानीनं आता जवळचे नातेवाईक आणि कुटुंबीयांच्या उपस्थितीत लग्न करण्याचा निर्णय घेतल्याचं कळतंय.

Farhan Akhtar-Shibani Dandekar
भारताचं राष्ट्रगीत टांझानियाच्या भावंडांनी गायलं; Video Viral

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com