चाळीशी ओलांडली तरी दिसते भारी; पाहा फोटो

bollywood actor mallika sherawat did a photoshoot in a pink colored saree.jpg
bollywood actor mallika sherawat did a photoshoot in a pink colored saree.jpg

मुंबई : हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये आपल्या आदाकरीने एकेकाळी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी अभिनेत्री म्हणजे मल्लिका शेरावत. तिचे खरे नाव रीमा लांबा आहे.  मल्लिकाचे अनेक चित्रपट लोक आजही पाहतात. मल्लिका सोशल मिडीयावर नेहमी सक्रिय असते. तिच्या वेगवेगळ्या लूकमधील फोटोशूटचे ती सोशल मिडीयावर शेअर करत असते. नुकतेच मल्लिकाच्या साडीमधील फोटोशूटने नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे. साडीमध्ये मल्लिका हॉट आणि ग्लॉमरस दिसत आहे. 

गुलाबी रंगाच्या साडीला सूट होईल असा गोल्डन कलरचा ब्लाऊज मल्लिकाने घातला आहे. तसेच ब्लाऊजला मॅचिंग असे गोल्ड इयरिंग आणि गोल्डन बांगड्या देखील तिने घातल्या आहेत. मल्लिकाने अभिनय क्षेत्रात काम करण्यापूर्वी मॉडेलिंग क्षेत्रात काम केले आहे. मल्लिकाने जीना सिर्फ मेरे लिए या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. मर्डर आणि ख्वाहिश या चित्रपटांमधून मल्लिकाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. मल्लिका आत्ता 44 वर्षांची आहे. तरी देखील तीचा फिटनेस आणि ब्युटी पाहून प्रेक्षक आजही आश्चर्यचकीत होतात. 

होळी निमित्त मल्लिकाने एक खास फोटो सोशल मिडीयावर शेअर केला आहे. या फोटोमध्ये ती लाल रंगामध्ये माखलेली दिसत आहे. या फोटोमध्ये मल्लिका  पिवळ्या साडीमध्ये सुंदर दिसत आहे. तिने हातात काळ्या रंगाचा गॉगल धरला आहे. तसेच तिने गोल्डन कलरचे कानातले घातले आहेत. या फोटोला देखील नेटकऱ्यांची पसंती मिळाली आहे. चित्रपटांबरोबरच मल्लिकाने सिरीयलमध्ये देखील काम केले आहे. सारा भाई वर्सेस साराभाई, द बॉचलरमेट इंडिया, हावाई फाईव-0 या मल्लिकाच्या प्रसिध्द मालिका आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com