'तू 110 किलोचा तुला कोण काम देणार', अभिनेता कसा होणार? शेवटी झालेच! |Bollywood Actor Manoj Pahwa Faced Body-Shaming | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bollywood Actor Manoj Pahawa Faced Body-Shaming

'तू 110 किलोचा तुला कोण काम देणार', अभिनेता कसा होणार? शेवटी झालेच!

Manoj Pahwa Faced Body Shaming: बॉलीवूडमध्ये असे काही कलाकार आहेत ज्यांना त्यांच्या दिसण्यामुळे ट्रोल करण्यात आले आहे. यामध्ये प्रसिद्ध अभिनेते मनोज पहावा यांचे नाव घ्यावे लागेल. या अभिनेत्याचं वजन हे तब्बल 110 किलो होतं. अशावेळी आपल्याला हिरो व्हायचं ही त्यांची इच्छा कायम होती. त्यासाठी त्यांनी वेगवेगळ्या निर्माते आणि दिग्दर्शक यांच्याकडे धाव घेतली होती. मात्र त्यांच्या पदरी निराशाच आली. अशावेळी आपलं स्वप्नं साकार होणार की नाही याची त्यांना भीती होती. मनात आणलं तर काहीही अशक्य नाही. असं म्हटलं जातं. मनोज पहावा यांच्याबाबतही असचं म्हणता येईल. त्यांनी आपल्या वजनावर कोणत्याही प्रकारे बंधन न आणता, त्याची लाज न बाळगता अभिनय क्षेत्रात वावर केला. आणि आज ते बॉलीवूडचे प्रसिद्ध अभिनेतेही आहेत.

एका मुलाखतीमध्ये त्यांनी आपल्याला वजनाच्याबाबत आलेल्या अनुभवाविषयी सांगितलं. मनोज यांनी त्या मुलाखतीमध्ये सांगितलं की, माझ्यासाठी तो खास अनुभव होता. मी त्यावेळी ज्या ज्या दिग्दर्शकांकडे गेलो होतो त्यांनी मला वजनामुळे भूमिका मिळणार नाहीत असं सांगितलं होतं. तू त्या अमूक भूमिकेमध्ये बसणार नाहीस, तू त्या भूमिकेचा विचार सोडून दे असं मला ऐकावं लागलं होतं. या साऱ्याचा परिणाम माझ्या विचार करण्यावर झाला होता. एक वेळ अशी होती की, मला एकानं 110 किलोचं वजन घेऊन तुला कोणी चित्रपटामध्ये घेणार आहे का असा प्रश्न विचारला होता. की जो खराही होता. मला माझ्या वजनावरुन अनेकांनी सांगितलं होतं. काहीचं म्हणणं हे प्रेमापोटी होतं. तर काहींनी मुद्दाम मला डिवचण्याचा प्रयत्न केला होता. एवढा वजनदार कुठे अभिनेता असतो का, जरी झाला तरी तुला कोणत्या स्वरुपाच्या भूमिका मिळतील असा प्रश्न मला नेटकरी विचारत होते. मी मात्र कुणाचं काहीही ऐकत नव्हतो. कारण खरं कारण मला माहिती होतं.

हेही वाचा: Chandramukhi Review: 'नेभळट दौलतराव, रडकी चंद्रकला' - प्रेमाचं पान रंगलचं नाही

एका इंग्रजी मासिकाला दिलेल्या मुलाखतीमध्ये आपल्याला बॉलीवूडमधील कोणत्या रियॅलिटीला सामोरं जावं लागलं य़ाविषयी सांगितलं आहे. ते म्हणाले, मला कित्येकवेळा बॉडी शेमिंगचा सामना करावा लागला होता. त्यामुळे मी निराशही झालो होतो. माझ्याकडे काहीही काम नव्हतं. स्वताला कसं सावरावं हा मुद्दा होता. मी मात्र जिद्द हारली नाही. आणि आपल्याला काही झालं तरी अभिनय सोड़ायचा नाही हे मनावर ठामपणे ठसवलं. पुढील प्रवासाला सुरुवातही झाली. ती पूर्ण केली. ज्यांनी आपल्या चित्रपटामध्ये काम देण्यास नकार दिला होता. त्यांनी पुन्हा ऑडिशन घेऊन कामावर बोलावलं. अशी आठवण मनोज यांनी यावेळी सांगितली.

हेही वाचा: पत्नी अनुष्का शर्मासोबत विराट कोहली पोहोचला जिममध्ये -Video Viral

Web Title: Bollywood Actor Manoj Pahwa Faced Body Shaming 115 Kg Weight Trolled Director Not Ready Offer Role

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top