'लाकडी घोड्यावर बसणारी ती झाशीची राणी'; मुकेश खन्ना भडकले

बॉलीवूडमध्ये आपल्या सततच्या वादग्रस्त विधांनामुळे चर्चेत आलेली अभिनेत्री म्हणून कंगनाची ओळख आहे.
actress kangana ranaut
actress kangana ranaut Team esakal

मुंबई - बॉलीवूडमध्ये आपल्या सततच्या वादग्रस्त विधांनामुळे चर्चेत आलेली अभिनेत्री म्हणून कंगनाची ओळख आहे. तिनं गेल्या काही दिवसांपूर्वी केलेल्या विधानांची देशभर चर्चा होती. बॉलीवूडमधील वेगवेगळ्या सेलिब्रेटींनी तिच्या त्या विधानावर तीव्र शब्दांत नाराजीही व्यक्त केली होती. मराठीतील ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी तर कंगनाची बाजू घेत आपण तिच्या पाठीशी आहोत अशा प्रकारचे विधान करुन लक्ष वेधून घेतले होते. अखेर त्यांनाही त्यावर पत्रकार परिषद घेऊन आपल्या विधानावर स्पष्टीकरण द्यावे लागले.

सध्या प्रसिद्ध अभिनेते शक्तिमान फेम मुकेश खन्ना यांनी कंगनावर तोफ डागली आहे. त्यांनी केलेल्या टीकेवर सोशल मीडियातून प्रतिक्रिया आल्या आहेत. देशाला मिळालेलं स्वातंत्र्य हे लढून नव्हे तर भीक मागून मिळाल्याचं मत कंगनानं व्यक्त केलं होतं. खरं स्वातंत्र्य 2014 मध्ये मिळाल्याचं तिनं म्हटल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या होत्या. त्यावर मुकेश खन्ना यांनी कंगनावर निशाणा साधला आहे. त्यांनी कंगनावर टीका करताना म्हटलं आहे की, तिला जो पद्मश्री पुरस्कार देण्यात आला आहे तो परत घेण्यात यावा. आपल्या देशाच्या विरोधात जो कोणी काही बोलेल त्याला त्याची चूक समजावून सांगण्याची गरज आहे. गेल्या काही दिवसांपासून वेगळ्या प्रकारे देशाचा अपप्रचार केला जात आहे. जे चूकीचे असल्याचे खन्ना यांनी सांगितलं आहे.

मुकेश खन्ना आपल्या व्हिडिओमध्ये म्हणतात की, देशाचा अपमान करण्यात कंगना तर वीर दासपेक्षाही पुढे गेली. ती स्वताला झाशीची राणी समजते. लाकडी घोड्यावर बसून मणिकर्णिका नावाची फिल्म करते. तोतया झाशीची राणी बनुन. तिनं आतापर्यत देशातल्या अनेक स्वातंत्र्य सैनिकांचा अपमान केला आहे. अशा व्यक्तिची मला शरम वाटते. अशा शब्दांत मुकेश खन्ना यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com