गुन्हेगारी भूमिकांबद्दल अभिनेता पंकज त्रिपाठी काय म्हणाला वाचा....

सकाळ न्यूज नेटवर्क
Wednesday, 10 June 2020

आपल्या खलनायकी अंदाजात एका वेगळ्या शैलीत विविध कलाकृतीमध्ये आठवणीत राहतील अशा भूमिका केल्यानंतर आता अभिनेता पंकज त्रिपाठी हे , “मला गुन्हेगारी भूमिकांचे आकर्षण नाही ” असे सांगत आहेत.

मुंबई ः आपल्या खलनायकी अंदाजात एका वेगळ्या शैलीत विविध कलाकृतीमध्ये आठवणीत राहतील अशा भूमिका केल्यानंतर आता अभिनेता पंकज त्रिपाठी हे , “मला गुन्हेगारी भूमिकांचे आकर्षण नाही ” असे सांगत आहेत. त्यांच्या या विधानामुळे बॉलीवूडमध्ये मोठे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. त्यांच्या विधानामागे काही तथ्य असणार असे बोलले जात आहे. 

वाचा ः ट्विटरचं नवं फीचर; स्टोरी स्वरुपात शेअर करता येणार तुमचं 'फ्लीट्स'...

मिर्झापूरमधील  “कालीन भैया ” असो की सेक्रेड गेम्स मधील  “गुरुजी ” आपल्या खलनायकी अंदाजाने अल्पावधीतच पंकज त्रिपाठी यांनी प्रेक्षकांची मने जिंकून घेतली आहेत. पंकज त्रिपाठी म्हणतात, की मला चित्रपटातील भूमिकांमध्ये अॅक्शन आवडत नाही. मला सामाजिक विषयांवरील फिल्म अधिक भावतात. मी जरी पडद्यावर अनेक खलनायकी भूमिका साकारल्या असल्या तरी कलाकार म्हणून मी ते केले. एक मनुष्य म्हणून मला सर्वाप्रमाणेच आवडीनिवडी आहेत. मला कल्पना आहे की माझ्या खलनायकी भूमिका असलेल्या फिल्मनी चांगला व्यवसाय केला होता. 

वाचा ः पावसाळ्यात कोरोनाचा फैलाव वाढणार? आयआयटी मुंबईचा नवा अंदाज; वाचा नेमकं काय आहे तर...

विशेष करून गुन्हेगारी स्वरूपाचा कंटेंटला प्रेक्षकांकडून मागणीही असते. त्यांना त्या प्रकारच्या कलाकृतीही आवडतात . परंतु एक जबाबदार व्यक्ती म्हणून मी विधान करतो की हिंसात्मक फिल्म मला अजिबात आवडत नाहीत. जेव्हा एक कलाकार म्हणून माझ्याकडे फिल्म येतात , तेव्हा सर्व प्रथम मी कथानकाला महत्व देतो.  त्यावर सर्व काही अवलंबून असते. सकारात्मक बाबींसाठी सकारात्मक कलाकृतींची निर्मिती होणे आवश्यक आहे, असे मत पंकज त्रिपाठी यांचे आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bollywood actor pankaj tripadi spoke on his negative role