
Bollywood News: बॉलीवूडचा प्रख्यात अभिनेता आमिर खान (Aamir Khan) हा त्याच्या वेगळ्या भूमिकेसाठी ओळखला जातो. त्यानं साऊथच्या गझनीचा रिमेक तयार केला होता. त्यामध्ये गझनीची भूमिका प्रसिद्ध अभिनेते प्रदीप रावत यांनी केली होती. आता त्यांनी (hindi news) बॉलीवूडमध्ये काम करताना कोणत्या प्रकारच्या अडचणी आल्या हे सांगितलं आहे. (entertainment news) प्रदीप यांनी बी आर चोप्रा यांच्या महाभारत मालिकेमध्ये काम केले होते. त्यातील त्यांच्या अश्वथात्माच्या भूमिकेला प्रेक्षकांनी दाद दिली होती. या मालिकेतील भूमिकेनं त्यांना वेगळी ओळख मिळवून दिली. आमिरबरोबर गझनीमध्ये साकारलेल्या (Bollywood Actor) भूमिकेनं त्यांना लाईमलाईटमध्ये आणलं. 2008 मध्ये प्रदर्शित झालेला गझनी (Gajani movie) हा पहिला भारतीय चित्रपट होता ज्यानं शंभर कोटींची कमाई केली होती. यात मोठा वाटा गझनी धर्मात्माचा रोल महत्वाचा होता.
गझनीला बॉक्स ऑफिसवर प्रचंड यश मिळालं होतं. त्या चित्रपटाला ए आर रहमान यांचं संगीत होतं. गाणीही हिट झाली होती. आमीरच्या बॉडीसोबतच गझनीची भूमिका करणाऱ्या प्रदीप रावत यांच्या भूमिकेनं प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले होते. भूमिका निवडीविषयी नेहमीच चिकित्सक आणि विचारशील असणाऱ्या प्रदीप हे बॉलीवूडमध्ये फार काळ रमले नाही. त्यांना तेथील काम करण्याच्या पद्धतीचा आणि त्यात चालणाऱ्या राजकारणाचा मोठा कंटाळा आला होता. अनेक वर्षांपासून प्रदीप यांनी बॉलीवूड चित्रपटांमध्ये काम केलेलं नाही. याबद्दल ते सांगतात की, मनासारखी स्क्रिप्ट मिळत नाही तोपर्यत त्या चित्रपटामध्ये काम करायचे नाही हे मी पहिल्यापासून ठरवलं होतं. मला बॉलीवूडचा पहिल्यापासून तिटकारा आहे. त्याठिकाणी म्हणावा असा आदर मिळत नाही. आणि आपल्याला प्रचंड मानसिक त्रासही होतो. असे रावत यांनी म्हटले होते.
बॉलीवूडनंतर रावत यांनी आपला मोर्चा हा टॉलीवूडकडे वळवला. त्याठिकाणी त्यांनी वेगवेगळ्या चित्रपटांमध्ये काम केले होते. त्यालाही प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. मध्यप्रदेशातील जबलपूरमध्ये राहणाऱ्या प्रदीप यांनी जेव्हा अभिनय क्षेत्रामध्ये करियअर करण्याचा विचार केला तेव्हा त्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागला होता. त्यानंतर त्यांना प्रसिद्ध टीव्ही मालिका महाभारतात अश्वथात्माची भूमिका करण्याची संधी मिळाली होती. हिंदीनंतर त्यांनी टॉलीवूडमध्ये काम करण्याचा निर्णय घेतला होता. एस एस राजामौली यांच्या सई चित्रपटामध्ये देखील त्यांनी भूमिका साकारली होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.