अखेर अकरा वर्षांनंतर राजकुमार राव, पत्रलेखा अडकले लग्नबंधनात : Rajkummar Rao Patralekhaa Wedding | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

rajkummar rao patralekhaa wedding

काही दिवसापूर्वी राजकुमार राव आणि पत्रलेखा यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला.

अखेर अकरा वर्षांनंतर राजकुमार राव, पत्रलेखा अडकले लग्नबंधनात

sakal_logo
By
टीम ईसकाळ टीम

गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असणारे बॉलिवूड इंडस्ट्रीतील लव्ह बर्ड्स अभिनेता राजकुमार राव (Rajkummar Rao) आणि पत्रलेखा (Patralekhaa) अखेर लग्नाच्या बंधनात अडकले. राजकुमार राव याने सोशल मिडियावर हि माहिती दिली आहे. त्यात तो म्हणाला, अखेर 11 वर्षांच्या प्रेमाचे रुपांतर आज लग्नात झाले. माझे कुटुंब, माझा जिवलग मित्रपरीवार यांच्या साक्षीने मी या बंधनात अडकलो आहे. मला पत्रलेखाचा पती म्हणवून घेण्यात खूप आनंद होत आहे.

काही दिवसापूर्वी राजकुमार राव आणि पत्रलेखा यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. यात राजकुमार राव गुडघ्यावर बसून पत्रलेखाला प्रपोज करताना दिसत होता. भय्यानी नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला होता.

राजकुमार राव,पत्रलेखा लग्नबंधनात अडकले.

राजकुमार राव,पत्रलेखा लग्नबंधनात अडकले.

राजकुमार राव याचे लग्नाचे निमंत्रण पत्र सोशल मिडियावर व्हायरल झाले होते. यात त्याने चंदीगडमधील आलिशान हॉटेल ओबेरॉय सुखविलास येथे लग्न करण्य़ाचा उल्लेख केला होता. शुक्रवारी (ता. १२) दोघांचा साखरपूडा झाला. कोरियोग्राफर फराह खान, अभिनेत्री हुमा कुरेशीसह अनेक प्रसिद्ध बॉलिवूड सेलिब्रिटी उपस्थित होते.

एकमेकांना करत होते डेट

राजकुमार आणि पत्रलेखा 2010 पासून एकमेकांना डेट करत होते. पत्रलेखाला त्याने पहिल्यांदा एका जाहिरातीत पाहिले होते. तेव्हापासून त्याला तिला भेटायचे होते. त्यानंतर दोघे पहिल्यांदाच सिटीलाईट चित्रपटा दरम्यान भेटले होते. त्यानंतर दोघांची मैत्री झाली आणि या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. त्यांनी लग्न करायचा निर्णय घेतला आणि आज ते लग्नबंधनात अडकले.

loading image
go to top