Alia Bhatt News| 'माझाही भुतकाळ रणबीरपेक्षा कमी नाही' आलिया असं का म्हणाली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ranbir kapoor and alia bhatta

'माझाही भुतकाळ रणबीरपेक्षा कमी नाही' आलिया असं का म्हणाली?

Bollywood News: बॉलीवूडमध्ये एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात ग्रँड सेलिब्रेशनला (Alia bhatt) सुरुवात होणार आहे. त्याचे कारण प्रसिद्ध अभिनेता रणबीर कपूर (Ranbir kapoor) आणि आलिया भट्ट हे लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत. गेल्या दोन ते तीन वर्षांपासून त्यांच्या लग्नाच्या तारखेवरुन चर्चा सुरु होती. अखेर त्यांच्या लग्नाचा मुहूर्त निघाला असून सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार येत्या 17 (Bollywood News) एप्रिलला मुंबईमध्ये त्यांचा विवाहसोहळा पार पडणार आहे. यापूर्वी देखील या दोन्ही सेलिब्रेटींच्या लग्नावरुन वेगवेगळ्या अफवा समोर आल्या होत्या. आता त्यावर पडदा पडला असून बॉलीवूडमधील ग्रँड सेलिब्रेशनला लवकरच सुरुवात होणार आहे. सोशल मीडियावर आलिया आणि रणबीरच्या हटके लवस्टोरीच्या गंमतीशीर गोष्टी व्हायरल होताना दिसत आहे. आलियानं आपल्या भुतकाळातील रिलेशनशिपवरुन काही गोष्टी शेयर केल्या आहेत. (Alia Bhatt News)

एप्रिलमध्येच रणबीर आणि आलिया लग्न करणार असल्याच्या वेगवेगळ्या गोष्टी मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर चर्चिल्या जात होत्या. आता मात्र त्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. या लग्नासाठी बॉलीवूडमधील दिग्गज सेलिब्रेटींना निमंत्रण देण्यात आले आहे. त्याची यादीही सोशल मीडियावर फिरते आहे. आलिया आणि रणबीरचा विवाहसोहळा संस्मरणीय कसा होईल यासाठी वेडिंग प्लॅनर नेमण्यात आले आहे. त्यांच्या लग्नाच्या सजावटीकडे देखील लक्ष असणार आहे. 2018 पासून आलिया आणि रणबीर एकमेकांना डेट करत ते लग्न कधी करणार असा प्रश्न त्यांना सातत्यानं विचारण्यात आला होता. ब्रम्हास्त्रच्या पोस्टर प्रदर्शनाच्यावेळी देखील रणबीरला आलियासोबतच्या लग्नावरुन छेडण्यात आले होते.

फिल्मफेअरला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये आलियानं रणबीरसोबतच्या रिलेशनशिपच्या काही गोष्टींना उजाळा दिला आहे. त्यामध्ये ती म्हणते, मी त्याच्याशी तो कलाकार आहे म्हणून लग्न करत नाही तो माणून म्हणून कसा आहे याचा विचार करुन एकत्र राहण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. मी खूप आनंदी आहे. तो एक चांगला व्यक्ती आहे. मात्र त्याच्या तुलनेत मी देखील काही कमी नाही. आमचा एकमेकांशी चांगला संवाद आहे. नातं टिकवण्यासाठी सगळ्यात जास्त ते महत्वाचे असते. असे मला वाटते. बऱ्याचदा तो माझ्यापेक्षाही चांगला व्यक्ती आहे. हे मला जाणवल्याचे आलियानं सांगितलं आहे.

हेही वाचा: RRR Review- नावं ठेवायचा विषयच नाही, स्टोरी दणदणीत अभिनय खणखणीत

यावेळी आलियाला रणबीरच्या भुतकाळातील रिलेशनशिपवरुन विचारण्यात आले तेव्हा तिनं सांगितलं त्याचा आता काय उपयोग, आणि ते काय जास्त महत्वाचे आहे का, प्रत्येकाचा भुतकाळ असतो. माझाही आहे. आणि मी पण काही कमी नाही. त्यामुळे आपण जसे आहे तसे समोरच्याला स्विकारुन पुढे जायचं, असंही आलियानं मुलाखतीतून स्वताला व्यक्त केलं.

Web Title: Bollywood Actor Ranbir Kapoor Alia Bhatt Love Story Viral Social Media

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..