esakal | 'तो सगळ्यांचा बाप आहे', रणदीप कुणाबद्दल बोललाय ?
sakal

बोलून बातमी शोधा

tiger and bear

'तो सगळ्यांचा बाप आहे',रणदीप कुणाबद्दल बोललाय?

sakal_logo
By
युगंधर ताजणे

मुंबई - सोशल मीडियावर (bollywood) बॉलीवूडमधील वेगवेगळ्या सेलिब्रेटींचे व्हिडिओ व्हायरल (viral video) होत असतात. त्याला चाहत्यांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसादही मिळताना दिसतो. सध्या प्रसिद्ध अभिनेता रणदीप हुडाचा (randeep hooda) एका व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्याला त्याच्या चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट दिल्या आहेत. तो व्हिडिओ चाहत्यांना आवडण्याचे दुसरे कारण म्हणजे त्याला रणदीपनं दिलेली कॅप्शन. वास्तविक एका जंगलातील तो व्हिडिओ असून त्यातून रणदीपनं आपल्याला वन्यप्राण्यांबद्दल असलेलं प्रेम व्यक्त करण्याचा प्रयत्न केला आहे. (bollywood actor randeep hooda Cheetah Forest animal viral photo and video)

रणदीप हुडाचं प्राण्यांविषयीचे प्रेम सर्वांना माहिती आहे. आता ती त्याची एक वेगळी ओळख झाली आहे. तो सोशल मीडियावर नेहमी त्याबाबत वेगवेगळ्या प्रकारच्या पोस्ट करत असतो. काही दिवसांपूर्वी त्यानं एका पाळीव श्वानाचा व्हिडिओ शेयर केला होता. तो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्याला चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंटही मिळाल्या होत्या. त्याचा आताचा जो व्हिडिओ आहे त्यामुळे प्रेक्षकांचे लक्ष वेधले गेले आहे. त्या व्हिडिओमध्ये एक वाघ अस्वलाला पाहून पळताना दिसत आहे.

व्हायरल व्हिडिओमध्ये आपल्याला दिसते की, जंगलामध्ये एक अस्वल वाघाचा पाठलाग करताना दिसते आहे. त्यावेळी वाघ आपला जीव वाचविण्याचा प्रयत्न करतो आहे. तो व्हिडिओ रणदीपनं शेयर केला आहे. त्यानं कॅप्शन दिलं आहे की, तो सर्वांचा बाप आहे. त्यानंतर त्या व्हिडिओला चाहत्यांनी मुक्तपणे कमेंट करण्यास सुरुवात केली आहे. एका युझर्सनं लिहिलं आहे की, आज लढाई करण्याचा वाघाचा मूड नसल्यानं त्यानं पळ काढला. दुसऱ्या युझर्सनं लिहिलं आहे की, हा प्रसंग खूपच गंमतीशीर आहे.

हेही वाचा: आंतरराष्ट्रीय महोत्सवात ‘स्वमान से’ ची निवड

रणदीपच्या आगामी काही प्रोजेक्टविषयी सांगायचे झाल्यास त्याच्याकडे महत्वाचे प्रोजेक्ट्स आहेत. त्याच्या चित्रपटांची प्रेक्षक वाट पाहत आहेत. त्यानं सलमानच्या राधे मध्ये व्हिलनची भूमिका केली होती. त्यात तो सलमानपेक्षा प्रभावी ठरल्याचं प्रेक्षकांचे म्हणणे होते. त्यानं यापूर्वी देखील सलमानच्या एका चित्रपटामध्ये काम केले होते. त्याच्या कामाचे प्रेक्षकांनी कौतूक केले होते.

loading image