आडनावामुळे बॉलिवुडमध्ये मिळालं नाही चांगलं काम! अभिनेत्याने केला खुलासा

Friday, 26 June 2020

सतत चांगला अभिनय करत असून देखील  काम मिळत नसल्याची खंत व्यक्त केली.

अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या निधनानंतर सध्या बॉलिवुड मध्ये परिवारवाद या विषयावर जोरदार चर्चा सुरु झाली आहे, या मुद्द्यावर बॉलिवुडमध्ये दोन गट पडले आहेत. एकाबाजूला स्वतःच्या मेहनतीच्या जोरावर बॉलिवुड सिनेसृष्टीत नाव कमवणरे अभिनेते इतर कलाकारांना परिवारातील ओळखीच्या जोरावर मोठे झाल्याचा आरोप करताना दिसत आहेत. अशातच अभिनेता रणवीर शौरी याने बॉलिवुड मध्ये चालणाऱ्या आडनावाबद्दल मोठा खुलासा केला आहे.

पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमतीवर रिचाने व्यक्त केली नाराजी...

अभिनेता रणवीर शौरी याची नुकतीच ‘कडक’ या वेबसिरीज प्रदर्शित झाली आहे, या वेब सिरीज मध्ये रणवीरच्या अभिनयाची स्तुती केली जात आहे. सोशल मिडीयामध्ये त्याच्या अभिनयाबद्दल भरभरुन बोलले जात असतानाच त्या दरम्यान रणवीरला उत्कृष्ट अभिनयासाठी पुरस्कार मिळाला पाहिजे अशी चर्चा सोशल मिडीयावर होत आहे. पण   त्याचे अडणाव हे त्याच्यासाठी अडचणाचे आहे असे बोलले जात असतानाच रणवीरने देखील एकाप्रकारे त्याला दुजोरा दिला आहे.  

 

 

‘या’ तारखेला होणार सुशांतचा शेवटचा चित्रपट ‘दिल बेचारा’ प्रदर्शित

 

एका ट्विटर वापरकर्त्याने रणवीरच्या अभिनयाची स्तुती करताना लिहीले की, “तुमची कडक ही सिरीज पाहिली, पण तुम्हा चांगला अभिनय करत पण इतक्या कमी चित्रपचात काम करण्याचा कंजूसपणा का करता?”  या प्रश्नावर रणवीरने चांगले काम मिळायला हवे प्रयत्न करतोय असे उत्तर दिले पण त्यावर चाहत्याने “आडनाव अडचण आहे का?” असा थेट प्रश्न विचारला त्यावर रणवीरने “बरोबर उत्तर” एवढीच प्रतिक्रीया दिली. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bollywood actor ranvir shorey says due to surname he is getting less work in bollywood