

बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख हा हिंदीच नाही तर मराठी चित्रपटातील लोकप्रिय अभिनेता आहे. आज रितेश देशमुखची ओळख आज एक लोकप्रिय अभिनेता असलं तरी त्यांची फिल्म इंडस्ट्रीत येण्याआधी त्याची ओळख ही वेगळी होती. त्याचे वडिल विलासराव देशमूख हे महाराष्ट्राचे मुख्यंमत्री असल्याने त्याला सर्वजण मुख्यमंत्र्यांचा मुलगा म्हणूनच ओळखच होते.
यामूळे अनेकांचं त्याच्या विषयी अनेक मत होते. त्यातच त्याची पत्नी जेनिलिया हिचंही रितेश बद्दल असंच वेगळं काही तरी मत होत.एक मुख्यमंत्र्यांचा मुलगा तर खूप गर्विष्ठ असणार अस मत जेनिलिया देशमुख होत. रितेश देशमुख आज त्याचा ४४ वा वाढदिवस साजरा करत आहे.
सर्वसामान्य घरातून आलेली जेनेलिया आणि राजकारणी घरातुन आलेला रितेश देशमुख यांची पहिली ओळख हैदराबाद एअरपोर्ट झाली तेव्हा जेनेलियाला वाटले रितेश देशमुख खुप घमंडी आहे. तो एक राजकारणी घरातुन आला आहे तर खुप आगाऊ असेल. पण नंतर जेव्हा ते एकमेंकाना चांगले ओळखू लागले तेव्हा या दोघांमध्ये चांगली मैत्री झाली. त्याच्यासोबत वेळ घालवल्यानंतर तिचं रितेश बदल मत वेगळं झालं.
एका शोमध्ये जेनेलियाने सांगितले होते रितेश बरोबर पहिल्यांदा मी मोठ्या अंहकारी आवाजात बोलले पण तेव्हा रितेश खुप सौम्य आवाजात बोलला तेव्हा माझं मत बदललं. रितेश आणि जेनेलियाने त्यांच्यात चालेलं प्रेमाचं नातं त्यांनी कोणालाच बरेच दिवस सांगितलं नव्हते सरळ लग्नाच निमंत्रण देतचं त्यांनी सर्वांना याबद्दल सांगितलं. दरम्यान, रितेश आणि जेनेलिया एकमेकांच्या जवळ आले आणि 10 वर्षे डेट केल्यानंतर दोघांनी 3 फेब्रुवारी 2012 रोजी लग्न केले. रितेश आणि जेनेलियामध्ये ९ वर्षांचा फरक आहे.
रितेश देशमुखच्या राजकीय कौटुंबिक पार्श्वभूमीमुळे, त्याच्या कुटुंबातील बहुतेक लोक या क्षेत्राशी संबंधित आहेत. मात्र रितेशने बॉलिवूडमध्ये आपला मार्ग निश्चित केला.
आज रितेश करिअरमध्ये बऱ्यापैकी यशस्वी आहे. पत्नी जेनेलिया , मुलगा राहिल आणि रिआनसोबत तो वेळ घालवतांना दिसतो. त्याचबरोबर हे कपल त्याचे कॉमेडी व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर करत असतात. त्याचबरोबर आता या जोडीचा पहिला सोबत मराठी चित्रपट वेड हा पदर्शित होणार आहे. या चित्रपटासाठी त्याचे चाहते खूप उत्सूक आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.