Kabhi Eid Kabhi Diwali Movie News | सलमानच्या पनवेलच्या फार्म हाऊसवर 'कभी ईद कभी दिवाली'चं शुटींग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

salman khan latest Movie news, Kabhi Eid Kabhi Diwali Movie News

सलमानच्या पनवेलच्या फार्म हाऊसवर 'कभी ईद कभी दिवाली'चं शुटींग

Kabhi Eid Kabhi Diwali: बॉलीवूडचा भाईजान सलमान खान (salman khan) हा नेहमीच त्याच्या हटकेपणामुळे चर्चेत असणारा अभिनेता आहे. सध्या त्याच्या मागे कोर्टाचा फेरा असून तो त्या कोर्टकचेऱ्यामध्ये अडकल्याचे दिसून आले आहे. अंधेरी कोर्टानं दिलेल्या निर्णयाला त्यानं आता उच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. (Bollywood Actors) गेल्या काही दिवसांत सलमान वेगवेगळ्या कारणामुळे चर्चेत आला आहे. सलमानच्या आगामी चित्रपटाची कभी ईद कभी दिवाली (Bollywood Movies) या चित्रपटाची मोठ्या प्रमाणावर सोशल मीडियावर चर्चा सुरु झाली आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, येत्या काळात या चित्रपटाची शुटिंग ही सलमानच्या पनवेलमधील फार्म हाऊसवर होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. (Kabhi Eid Kabhi Diwali Movie News)

आतापर्यत बऱ्याचवेळा सलमानच्या या चित्रपटावरुन वेगवेगळ्या प्रकारे वाद निर्माण झाला आहे. त्याचे शेड्युल्ड अनेकदा पुढे ढकलण्यात आले आहे. फिल्मसिटीतून या चित्रपटाचा सेट काढण्यात आला असून तो आता सलमानच्या पनवेलमधील फार्महाऊसवर तो सेट लावण्यात आल्याचे सुत्रांनी सांगितले आहे. वेगवेगळ्या कारणांमुळे सलमानच्या कभी ईद कभी दिवाली या चित्रपटाच्या शुटींगला उशीर होताना दिसत आहे. अशावेळी निर्माता साजिद नाडियावाला आणि सलमान यांनी मिळून या चित्रपटाचा सेट पनवेलमध्ये उभारण्याचा विचार करत होते. टाईम्स ऑफ इंडियाच्या एका रिपोर्टनुसार फरहाद सामजी या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे.

हेही वाचा: Salman Ex Girlfriend: ऐश्वर्यासारखे त्या अभिनेत्रींकडूनही सत्य बाहेर येईलच

कभी ईद कभी दिवालीचं कास्टिंग पूर्ण झालं असून प्रॉडक्शनला सुरुवात होणार आहे. सुरुवातीला साजिद नाडियावाला या चित्रपटाचे निर्माते होते. आता सगळी सुत्रं सलमाननं आपल्या हातात घेतली आहे. सलमान आणि साजिदमध्ये काही कारणास्तव वाद झाल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र त्याच्या जवळच्या मित्रांचे असे म्हणणे आहे की, त्यांचे आपआपसात कोणत्याही प्रकारचे वाद नसून सलमानच्या या प्रोजेक्टला उशीर झाल्यानं त्यानं सेटविषयी निर्णय घेतला आहे. सलमानच्या आगामी प्रोजेक्टविषयी सांगायचे झाल्यास सध्या तो त्याच्या टायगर 3 च्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे. चाहत्यांना त्याच्या या चित्रपटाची मोठ्या प्रमाणात उत्सुकता आहे.

Web Title: Bollywood Actor Salman Khan Kabhi Eid Kabhi Diwali Shooting Panvel Farm House

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top