Salman Ex-Girlfriend: ऐश्वर्यासारखे त्या अभिनेत्रींकडूनही सत्य बाहेर येईलच|Bollywood Actor Salman Khan Ex Girlfriend Somy | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

somi ali and salman khan

Salman Ex Girlfriend: ऐश्वर्यासारखे त्या अभिनेत्रींकडूनही सत्य बाहेर येईलच

Bollywood News: सलमान खानची एक्स गर्लफ्रेंड सोमी अलीनं आता तर (salman khan) धक्कादायक खुलासा केला आहे. तिला काही करुन बॉलीवूडमधील 'हार्वे वेनस्टेन' कोण आहे याचा शोध घ्यायचा आहे. ज्यानं (Somy Ali) आतापर्यत बॉलीवूडमधल्या अनेक अभिनेत्रींचे लैंगिक शोषण केले असा सेलिब्रेटी कोण आहे, याविषयीचं सत्यही लवकरच समोर येणार असल्याचे सोमीनं सांगितलं आहे. सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असणाऱ्या सोमीच्या या पोस्टनं चाहत्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. सलमानची एक्स गर्लफ्रेंड यामुळे लोकप्रिय झालेल्या सोफीनं जी पोस्ट शेयर केली आहे ती सलमानच्या दुसऱ्या एक्स गर्लफ्रेंडला टॅग केली आहे. तिचं नाव बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री ऐश्वर्या रॉय (Aishwarya Rai) आहे.

सलमानच्या गर्लफ्रेडनं सोमीनं बॉलीवूडमधील जे माफिया आहेत त्यांच्यावर टीका केली आहे. 90 च्या दशकामध्ये सोमी आणि सलमानचं नाव घेतलं जायचं. त्यांनी बराच काळ एकमेकांना डेटही केलं. मात्र ते रिलेशनशिप फार काळ टिकलं नाही. सोमी सोशल मीडियावर सक्रिय असणारी सेलिब्रेटी आहे. ती नेहमीच चर्चेत राहण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया देत असल्याचे दिसून आले आहे. आता ती ऐश्वर्या रॉयचं नाव घेतल्यानं चर्चेत आली आहे. बॉलीवूडमध्ये ज्या व्यक्तीनं सर्वाधिक अभिनेत्रींचं लैंगिक शोषण केले आहे त्याला तिनं 'बॉलीवुड चा हार्वे वेनस्टेन' असं म्हटलं आहे. सोमीनं सोशल मीडियावर यासंबंधी एक पोस्ट देखील शेयर केली आहे. मात्र तिनं त्या नावाबाबत कोणताही खुलासा केलेला नाही.

हेही वाचा: RRR Review- नावं ठेवायचा विषयच नाही, स्टोरी दणदणीत अभिनय खणखणीत

सोमी म्हणते, एक ना एक दिवस बॉलीवूडमध्ये काय चालतं हे लोकांना कळेलच. सोमीनं तिच्या इंस्टा पोस्टमध्ये एका मुलीचा फोटो शेयर केला आहे. ती व्यक्ती कोण हे कळत नसले तरी, याबाबत लवकरच खुलासा करणार असल्याचे सांगितले आहे. तिनं ही पोस्ट ऐश्वर्या रॉयला देखील टॅग केली आहे. बॉलीवूडच्या हार्वे वेनस्टेनला मला सांगावेसे वाटते की, एक दिवस तुझं खरं रुप लोकांसमोर आल्याशिवाय राहणार नाही. त्या गोष्टी चाहत्यांना कळतील. जसं ऐश्वर्याबद्दल समजलं तसं. सोमीची पोस्ट सोशव मीडियावर वेगानं व्हायरल झाली असून नेटकऱ्यांनी सोमी कुणाबद्दल बोलत आहे असा प्रश्न पडला आहे.

हेही वाचा: Movie Review: बच्चन पांडे पाहायला जातायं, पण, तो तर...

Web Title: Bollywood Actor Salman Khans Ex Girlfriend Somy Ali Who Is A Bollywood Weinstein

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..