esakal | कर्करोगावरील उपचारासाठी अभिनेता संजय दत्त अमेरिकेला जाणार
sakal

बोलून बातमी शोधा

कर्करोगावरील उपचारासाठी अभिनेता संजय दत्त अमेरिकेला जाणार

अभिनेता संजय दत्तला श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने त्याला मुंबईच्या लीलावती रुग्णालयात शनिवारी दाखल करण्यात आले होते. तिथे त्याच्या अनेक चाचण्या करण्यात आल्या.

कर्करोगावरील उपचारासाठी अभिनेता संजय दत्त अमेरिकेला जाणार

sakal_logo
By
संतोष भिंगार्डे

मुंबई : बॉलीवूड अभिनेता संजय दत्तला तिसऱ्या स्टेजमधील फुफ्फुसाचा कर्करोग झाल्याचे निदान झाल्याने पुढील उपचारासाठी तो परदेशात जाणार आहे. न्यूयॉर्कमधील मेमोरियल स्लोआन केटरिंग कॅन्सर सेंटरमध्ये उपचारासाठी चर्चा सुरू झाली असून तो लवकरच अमेरिकेला जाणार आहे.

नवी मुंबईतील खासगी रुग्णांच्या लुटमारीला महापालिकेचा चाप; आयुक्तांकडून कारवाईचा इशारा

दरम्यान, संजयच्या प्रकृतीसंदर्भात त्याची पत्नी मान्यता दत्त हिने एक निवेदन जारी केले आहे. त्यात तिने लिहिले की, "संजूच्या प्रकृतीसाठी ज्यांनी प्रार्थना केली आहे, अशा सर्वांचे मी आभार मानते. या संकटातून बाहेर पडण्यासाठी आम्हाला तुमच्या प्रार्थनेची आवश्यकता आहे. या कुटुंबाने यापूर्वी खूप सहन केले आहे, परंतु मला खात्री आहे की ही वेळदेखील जाईल. तथापि, आपणा सर्वांना माझी विनंती आहे की कोणत्याही अफवांकडे लक्ष देऊ नका. आम्हाला मदत करा आणि तुमचे प्रेम आणि समर्थन असेच आमच्यासोबत असू द्या. संजू हा नेहमी सेनानी होता आणि म्हणून आमचे कुटुंबही खंबीरपणे लढत आहे. देव पुन्हा एकदा आमची परीक्षा घेत आहे. आम्हाला आपले प्रेम आणि आशीर्वाद यांची फार आवश्यकता आहे. आम्हाला माहीत आहे की यावेळीदेखील आम्ही नक्कीच जिंकू."

IPL खेळण्याचं स्वप्न अधूरं! मुंबईकर क्रिकेटपटूनं संपवलं जीवन

अभिनेता संजय दत्तला श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने त्याला मुंबईच्या लीलावती रुग्णालयात शनिवारी दाखल करण्यात आले होते. तिथे त्याच्या अनेक चाचण्या करण्यात आल्या. त्या चाचण्यांचे रिपोर्ट्स मंगळवारी आले आणि त्याला फुफ्फुसाचा कर्करोग असल्याचे निष्पन्न झाले.
-----------
संपादन : ऋषिराज तायडे